Ram Mandir Chori : दानचोरी प्रकरण तापले.! अरविंद केजरीवाल यांची मोठो घोषणा, घेतला ‘हा’ निर्णय
या संपूर्ण प्रकरणामुळे उद्भवलेला वाद पाहता, उत्तर प्रदेश सरकारने १३ जून रोजी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक विशेष तपास पथक स्थापन केले आहे.

Ram Mandir Chori | Arvind Kejriwal – अयोध्या राम मंदिरातील कथित देणगी चोरीच्या वादामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या शुक्रवारी, म्हणजेच २६ जून रोजी ते अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेणार आहेत.
केजरीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हिंदीत पोस्ट करत लिहिले की, अयोध्या श्री राम मंदिरातील दान चोरीच्या घटनेमुळे प्रत्येक सनातनी व्यक्ती अत्यंत दुःखी आहे. येत्या शुक्रवारी मी दर्शनासाठी श्री राम मंदिरात जाणार आहे.
गेल्या आठवड्यात आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या अधिकार्यांवर भ्रष्टाचार आणि देणगी चोरीचे गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी दोषी अधिकार्यांवर एफआयआर (गुन्हा) दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली होती.
या संपूर्ण प्रकरणामुळे उद्भवलेला वाद पाहता, उत्तर प्रदेश सरकारने १३ जून रोजी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक विशेष तपास पथक स्थापन केले आहे.
मंदिरातील दानपेटीतून कोट्यवधी रुपयांची रोकड आणि दागिने गायब झाल्याचा संशय असून, सध्या एसआयटी या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांना पुराव्याशिवाय वक्तव्ये न करण्याचे आवाहन केले असून, एसआयटीचा अहवाल येईपर्यंत संयम ठेवावा, कोणत्याही दोषीला सोडले जाणार नाही, असे आश्वासन दिले आहे.
आता अरविंद केजरीवाल यांच्या अयोध्या दौऱ्यामुळे या प्रकरणाला अधिकच राजकीय रंग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






