राम चरणच्या ‘गेम चेंजर’ चित्रपटाच्या कमाईत घसरण; एकुण कलेक्शन किती ?

Game Changer Box Office Collection | दाक्षिणात्य अभिनेता राम चरण आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका असलेला ‘गेम चेंजर’ चित्रपट 10 जानेवारीला रिलीज झाला. या चित्रपटाच्या गाण्याने सुरुवातीलाच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. त्यानंतर या चित्रपटाबाबतची चाहत्यांची उत्सुकता अधिक वाढली.
राम चरणच्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बंपर ओपनिंग झाली होती. मात्र त्यानंतर बॉक्स ऑफिसवर तो वेग वाढवू शकला नाही आणि या चित्रपटाच्या कमाईत घसरण झाल्याचे दिसले. या चित्रपटाने रिलीजच्या 6 व्या दिवशी किती कमाई केली, हे पाहुयात.
‘गेम चेंजर’ चित्रपटाची आतापर्यंतची कमाई किती?
चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, पहिल्या दिवशी ‘गेम चेंजर’ने 51 कोटी रुपयांचे खाते उघडले होते. दुसऱ्या दिवशी 21.6 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. तिसऱ्या दिवशी चित्रपटाची कमाई 15.9 कोटींचा व्यवसाय केला. Game Changer Box Office Collection |
तर चौथ्या दिवशी ‘गेम चेंजर’चे कलेक्शन 7.65 कोटी रुपये झाले. पाचव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली आणि त्याने 10 कोटींचा व्यवसाय केला. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या सहाव्या दिवसाची कमाई 6.50 कोटी रुपये झाली आहे. यासह, ‘गेम चेंजर’ची 6 दिवसात एकूण कमाई आता 112.65 कोटी रुपये झाली आहे. Game Changer Box Office Collection |
सहाव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर खराब कामगिरी
‘गेम चेंजर’ चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन 6 दिवस झाले आहेत. चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे पण बॉक्स ऑफिसवर त्याची कामगिरी फारच खराब आहे. खरं तर हा चित्रपट 450 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा पूर्ण होणार आहे, पण अर्धे बजेटही तो वसूल करू शकलेला नाही.
चित्रपटाच्या कमाईचे आकडे फ्लॉप झाल्याचे संकेत देत आहेत. आता दुसऱ्या वीकेंडला हा चित्रपट जास्तीत जास्त कलेक्शन मिळू शकणार का? हे पहावे लागणार आहे. दरम्यान, ‘गेम चेंजर’ हा चित्रपट एस. शंकर दिग्दर्शित आहे. ‘गेम चेंजर’मधील राम चरण आणि कियाराच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
हेही वाचा:
Baramati : काका पुतण्यात ‘अबोला’ कायम; नणंद भावजय शेजारी-शेजारी, ही आहे का नवी राजकीय नांदी?





