पुणेः बारामतीमध्ये कृषी विज्ञान केंद्राच्या कृषीक कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर आल्याचे पाहिला मिळाले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच काका पुतणे एकाच व्यासपीठावर आले होते. तसेच सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद भावजय निवडणुकीनंतर एकाच मंचावर उपस्थित होत्या. या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते, मात्र दोघांनीही साध्यं एकमेकांकडे पाहलं सुद्धा नाही. शिवाय एकमेकांना नमस्कार करण्याच देखील टाळलं. यामुळे दोघांमध्ये अद्यापही अबोला कायम असल्याचे दिसून आले.
व्यासपीठाच्या डाव्या बाजूला अजित पवार तर उजव्या बाजूला शरद पवार आसनस्थ झाले होते. त्यांची आसनव्यस्था शेजारी शेजारी करण्यात आली नव्हती. या दोघांच्यामध्ये अजित जावकर यांच्या नावाची खुर्ची लावण्यात आली होती. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या खुर्चीत अंतर होते. लोकसभा निवडणुकीमध्ये एकमेकींच्या विरोधात लढलेल्या नणंद भावजय सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या देखील आज एकाच मंचावर शेजारी शेजारी बसल्याचे दिसून आले. यामुळे आता राज्याच्या राजकारणात नवी राजकीय नांदी असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
काका-पुतण्यात ‘अबोला’ कायम
या कार्यक्रमाला माजी केंद्रीयमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनेत्रा पवार, आमदार रोहित पवार, मंत्री पंकजा मुंडे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात काका पुतणे एकमेकांशी संवाद साधणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. मात्र, दोघांनीही एमेकांशी बोलणं टाळलं यावरून अद्यापही दोघांमध्ये अबोला कायम असल्याचे दिसून आले.