Klin Kaara 3rd birthday: राम चरणने जुळ्या बाळांच्या जन्मानंतर पहिल्यांदाच दाखवला मोठ्या लेकीचा चेहरा
Klin Kaara 3rd birthday: अलीकडेच राम चरण आणि उपासना यांनी त्यांच्या लग्नाच्या १४ व्या वाढदिवसानिमित्त नवजात जुळ्या मुलांची पहिली झलक दाखवली

Klin Kaara 3rd birthday: अभिनेता राम चरण आणि त्याची पत्नी उपासना कोनिडेला यांची लेक क्लीन कारा 3 वर्षांची झाली आहे. नुकताच तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या खास दिवशी राम चरणने पहिल्यांदाच लेकीचा चेहरा दाखवला आहे.
क्लीन काराच्या वाढदिवसानिमित्त उपासनाने खास पोस्ट केली आहे. यात तिने “आमच्या लाडक्या क्लीन काराला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!” असं कॅप्शन या फोटोला दिलं आहे. उपासनाच्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी ती हुबेहुब तिची आई उपासनासारखी दिसतेय, असं म्हटलं आहे.
View this post on Instagram
दरम्यान, अभिनेता राम चरण आणि उपासना कोनिडेला कॉलेजमध्ये एकत्र होते. तिथेच त्यांची चांगली मैत्री झाली, पुढे ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे लग्न १४ जून २०१२ रोजी हैदराबाद येथे झाले होते. या सोहळ्याला सिनेसृष्टी, राजकीय आणि उद्योगजगतातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. Klin Kaara 3rd birthday
राम चरण व उपासना यांनी लग्नानंतर ११ वर्षांनी २०२३मध्ये आपली पहिली लेक क्लीन कारा हिचं स्वागत केलं. त्यानंतर अडीच वर्षांनी त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी जुळी अपत्ये झाली.
View this post on Instagram
अलीकडेच राम चरण आणि उपासना यांनी त्यांच्या लग्नाच्या १४ व्या वाढदिवसानिमित्त आपल्या नवजात जुळ्या मुलांची पहिली झलक दाखवली होती. त्यांनी आपल्या तिन्ही मुलांच्या चिमुरड्या हातांचा एक क्युट फोटो पोस्ट केला होता.
दरम्यान, राम चरण आणि जान्हवी कपूर स्टारर ‘पेड्डी’ हा चित्रपट अलीकडेच बॉक्स ऑफिसवर रिलीज आहे. ज्याला चाहत्यांचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. Klin Kaara 3rd birthday
हेही वाचा:
Pune-Bengaluru Highway Accident: साताऱ्याजवळ टेम्पो ट्रॅव्हलरची ट्रकला धडक; अपघातात 2 जणांचा मृत्यू





