राम चरणने शेअर केला लेकीचा फोटो

Ram Charan। राम चरणने पुन्हा एकदा लेक क्लिन काराचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत ती तिचे आजोबा चिरंजीवी आणि सुरेखा यांच्यासोबत पोज देताना दिसत आहे.
राम चरणची पत्नी उपासना सुद्धा कुटुंबासोबत पोज देताना दिसत आहे. राम चरणने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर फोटो शेअर केला आणि लिहिले, ‘क्लीन कारची तिच्या आजोबांसह पहिली ट्रिप!!! संस्मरणीय.’
View this post on Instagram
फोटोत आयफेल टॉवर देखील दिसत आहे. हा फोटो शेअर होताच चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी कमेंट विभागात हार्ट इमोजी जोडले. एका चाहत्याने लिहिले,’सुपर बॉस. काही लोकांनी चिरंजीवीला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या.’राम चरण फॅमिली टाइम एन्जॉय करतांना दिसत आहे.
राम चरणच्या वर्क फ्रंटबाबत सांगायचे झाल्यास, तेलुगू सुपरस्टार राम चरणने अखेर त्याच्या ‘गेम चेंजर’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. एस शंकर दिग्दर्शित चित्रपटाचे शूटिंग राम चरण यांनी २०२१ मध्ये सुरू केले होते. या चित्रपटात कियारा अडवाणी देखील आहे. नुकताच रामने चित्रपटाच्या सेटवरील पहिल्या दिवसाचा आणि शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचा एक फोटो शेअर केला आणि त्याने चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केल्याचेही जाहीर केले.
‘गेम चेंजर’मध्ये राम चरण आणि कियारा अडवाणी व्यतिरिक्त अंजली, एसजे सूर्या, जयराम, सुनील, श्रीकांत, समुथिर्कानी आणि नस्सर यांच्याही भूमिका आहेत. राम चरण राम मदन या आयएएस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे, तर कियारा अडवाणी त्याची मैत्रीण आणि आयएएस अधिकारी असेल.





