रकुल प्रीत सिंहने केला धक्कादायक खुलासा,’नेपोटिझममुळे अनेक चित्रपट गमावले’

Rakul Preet Singh । अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने साऊथपासून बॉलिवूडपर्यंत तिची खास ओळख निर्माण केली आहे. या अभिनेत्रीने केवळ तमिळ आणि तेलुगू भाषांमध्येच अनेक सुपरहिट चित्रपट केले नाहीत तर हिंदी चित्रपटसृष्टीत दे दे प्यार दे, रनवे 34, डॉक्टर जी आणि छत्रीवाली सारखे अनेक चित्रपट केले आहे.
View this post on Instagram
कोणत्याही इंडस्ट्री पार्श्वभूमीशिवाय रकुलने चित्रपटांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. सध्या रकुल अजय देवगण आणि आर माधवनसोबत तिच्या आगामी ‘दे दे प्यार दे 2’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सगळ्या दरम्यान अभिनेत्रीने एका मुलाखतीत बॉलीवूडमधील नेपोटिझमबद्दल बोलले.
रकुल नुकतीच ‘द रणवीर शो’मध्ये पोहोचली होती. यादरम्यान अभिनेत्री नेपोटिझमबद्दल बोलली. तिच्या अनुभवाबद्दल मोकळेपणाने बोलत असताना, रकुलने कबूल केले की तिने आपल्या करिअरमध्ये घराणेशाहीमुळे चित्रपट गमावले, परंतु तिने त्याकडे दुर्लक्ष करणे पसंत केले. रकुल म्हणाली, “हो, असं होतं, आणि मी चित्रपट गमावले, पण मी अशा प्रकारची व्यक्ती नाही जी दुर्लक्ष करत समोरचा विचार करते. कदाचित ते चित्रपट माझ्यासाठी बनवलेले नसतील.’ आयुष्यातील चढ-उतार समजून घेणे हे प्रगतीसाठी महत्त्वाचे आहे,घराणेशाहीचा जास्त विचार करू नका असे तिने सांगितले.
वर्क फ्रंटवरबाबत सांगायचे झाल्यास, रकुल ‘दे दे प्यार दे 2’ च्या पुढील शेड्यूलची तयारी करत आहे, ज्याचे शूटिंग पंजाबमध्ये अजय देवगण आणि आर माधवनसोबत केले जाईल.





