वाघोली – रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने माजी सैनिक कल्याण संघटना पुणे जिल्हा यांनी खडकी छावणी येथे वीरमाता, वीरनारी यांच्या हस्ते सैनिकांना राखी बांधून सण साजरा केला.
भारतीय सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांबद्दल आत्मीयता व बंधुत्व निर्माण करण्याच्या हेतूने सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरा करण्याचा निर्धार माजी सैनिक संघटनेच्या वतीने करण्यात आला होता. त्यानुसार सैनिकांना राखी बांधून हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र माजी सैनिक संघटना अध्यक्ष अनिल सातव पाटील यांनी दिली.
याप्रसंगी कर्नल नेगी, कर्नल सूर्यवंशी, सुभेदार चौगुले ,छाया सातव,गंगा गोसावी,वनिता लगड,सुनिता ढवळे,रजनी ताम्हणकर,शिल्पा ढवळे,सुनिता औटी,लीला झरेकर,शारदा पवार,सुनंदा सातपुते, वैशाली आंधळे, संगीता कुटे, वरपे ताई, अध्यक्ष अनिल सातव, उपाध्यक्ष मारुती भाऊ कुटे, सचिव आनंद गोसावी ,सूर्यकांत ताम्हणकर, जगदीश सातपुते, संघटक कल्याण लगड, आप्पासाहेब पवार ,श्रीराम आंधळे, बाबासाहेब तारडे, आदी मान्यवर उपस्थित होते.