पिंपरी | वाकड पोलीस ठाण्यात पोलीस बांधवासोबत रक्षाबंधन

हिंजवडी, (वार्ताहर)- वाकडमधील रणजित आबा कलाटे फाउंडेशनच्या अध्यक्षा स्नेहा रणजित कलाटे व वाकडमधील विविध सोसायट्यांमधील महिला भगिनींनी वाकड पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या पोलिस बांधवांना राखी बांधून बहीण भावाच्या पवित्र नात्याचा अनोखा रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा केला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही कलाटे फाउंडेशनच्या वतीने वाकड, पिंपळे निलख, जगताप डेअरी परिसरातील सुमारे पंधरा हजार कुटूंबात राखी भेट देण्यात आली.
स्नेहा कलाटे यांनी बहीण भावाच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेली राखी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रत्येक घरोघरी पोचविण्यात आली. त्यामुळे त्यांच्या या सामाजिक सलोखा जोपासणाऱ्या उपक्रमाचे मोठे कौतुक होत आहे.
यावेळी त्यांनी निवडक महिलांना घेऊन वाकड पोलीस ठाण्यात सर्व पोलीस बंधू-भगिनींसोबत रक्षाबंधनचा पवित्र सण साजरा केला.
याप्रसंगी वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी तसेच स्नेहा कलाटे,विशाखा भागवत, स्नेहल पाटील,दीप्ती गर्ग, प्राची लांजेवर, श्वेता अग्रवाल, स्वाती गुल्हाने ,ज्योती पंडित, अर्चना महाले, विशाखा देशपांडे आदी उपस्थित होते.
” आपल्या परिसरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन आहोरात्र प्रयत्न करत आहेत. सणासुदीला देखील त्यांच्यातील कर्तव्य निष्ठतेमुळे महिला, तरुणी, विद्यार्थिनी आज शहरात सुरक्षित आहेत.
आपल्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज फाउंडेशनच्या वतीने राखी बांधून बहीण भावाचे अतूट नाते टिकविण्यासाठी हा रक्षाबंधनाचा उपक्रम घेण्यात आला आहे. ” स्नेहा कलाटे ( अध्यक्षा- रणजित आबा कलाटे फाउंडेशन)





