Raksha Bandhan 2025 : यंदाच्या ‘रक्षाबंधन’ला ट्राय करा ‘हे’ खास साडी लूक; तुम्ही वाटाल परफेक्ट ‘सेलिब्रिटी’

Raksha Bandhan: रक्षाबंधन म्हणजे केवळ राखी बांधण्याचा सण नव्हे, तर भावंडांमधल्या नात्याला नवसंजीवनी देणारा खास दिवस. या दिवशी बहिणी आपल्या भावासाठी प्रेमाने राखी आणतात, तर भाऊही तिच्या आनंदासाठी खास गिफ्ट देतो. सणाचा हा उत्सव जितका भावनिक असतो, तितकाच तो सौंदर्यपूर्णही असतो. विशेषतः महिलांसाठी हा दिवस म्हणजे स्वतःला सजवण्याचा, नटण्याचा एक खास योग!
सण म्हटल, की साडी ही ओघाने येते. पारंपरिकतेला आधुनिकतेचा स्पर्श देणाऱ्या साड्यांचे अनेक प्रकार सध्या फॅशनमध्ये आहेत. सेलिब्रिटींप्रमाणे तुम्हीही या रक्षाबंधनात काही खास साडी लुक्स ट्राय करू शकता.
1. फ्लोरल प्रिंट साडी – सोज्वळ आणि ट्रेंडी लूक
फ्लोरल प्रिंट साड्या या नेहमीच सौंदर्य खुलवणाऱ्या आणि फॅशनेबल ठरल्या आहेत. आलिया भट्ट किंवा करीना कपूरसारख्या अभिनेत्रीने परिधान केलेल्या हलक्या जॉर्जेट, ऑर्गेन्जा किंवा शिफॉन साड्या सध्या खूप लोकप्रिय आहेत.
स्टाइल टिप्स:
-स्लीव्हलेस किंवा डीप बॅक ब्लाऊज.
-साधा मेकअप आणि न्यूड लिपस्टिक.
-ऑक्सिडाईज ज्वेलरी आणि सडसडीत पोनीटेल किंवा खुल्या केसांमध्ये सॉफ्ट वेव्ह्स.

2. नऊवारी साडी – पारंपरिक मराठमोळा तेज
महाराष्ट्राची शान म्हणजे नऊवारी साडी. सणवार, पूजाअर्चा यासाठी ती नेहमीच परिपूर्ण ठरते. अमृता खानविलकरसारख्या अभिनेत्रीचा नऊवारी लूक यासाठी प्रेरणादायक आहे.
स्टाइल टिप्स:
-खणाच्या पातळ ब्लाऊजसोबत नऊवारी.
-नथ, कुडे, गजरा आणि अंबाडा.
-कोल्हापुरी चपला किंवा मोजड्यांची साथ.

3. राजस्थानी घाघरा साडी – रंगीबेरंगी राजसी लूक
घाघरा साडी म्हणजे जणू रंगांचा उत्सव! बंधेज, गोटा पट्टी आणि झळाळती जरी यामुळे तुमचा लूक झटकन उठून दिसेल. ‘अनुपमा’ किंवा ‘पंड्या स्टोअर्स’ या मालिकांमधील लूक यासाठी आदर्श आहे.
स्टाइल टिप्स:
-माथापट्टी, झुमके, आणि मोठ्या रंगीबेरंगी बांगड्या
-आयलाइनर आणि गडद काजळ
-अर्धसर ओढणी आणि गोटा बॉर्डर डिझाइन

4. कांजीवरम किंवा सिंपल सिल्क साडी – एलिगंट आणि रॉयल
जर तुम्हाला सणात थोडं रॉयल आणि एलिगंट दिसायचं असेल, तर कांजीवरम किंवा सिल्क साडी हे सर्वोत्तम पर्याय आहेत. दीपिका पदुकोण आणि विद्या बालन यांच्या साडी लुक्स हे याचे सर्वोत्तम उदाहरण आहेत.
-मोठे झुबे, गोल टिकली आणि गजरा.
-मऊ सिल्कच्या साडीसोबत स्लीव्हलेस किंवा फुल बाही ब्लाऊज.
-क्लासिक बन किंवा अंबाडा.

या रक्षाबंधनात साजेशी साडी आणि योग्य अॅक्सेसरीज वापरून तुम्ही प्रत्येक फोटोमध्ये इतक्या सुंदर दिसाल, की सेलिब्रिटींच्या लुकलाही टक्कर द्याल!





