Ishwarpur News : ऊसदराच्या कोंडीवरून माजी खासदार राजू शेट्टी आक्रमक; ३ नोव्हेंबरला पुणे – बंगळूर रास्ता रोको
Ishwarpur News : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे आणि ऊसदराकडे साखर कारखानदार व सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

Ishwarpur News : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे आणि ऊसदराकडे साखर कारखानदार व सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. (Ishwarpur News)
३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोल नाका येथे हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत ‘आरपारची लढाईसाठी’ रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली. (Ishwarpur News)
या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी त्यांनी सांगली जिल्ह्यातील मिरज, पलूस, वाळवा, शिराळा, तासगांव तालुक्यातील अनेक गावांचा झंझावाती दौरा करत बैठकांचा धडाका लावला. (Ishwarpur News)
राजू शेट्टी यांनी दिवसभरात वरील तालुके अक्षरशः पिंजून काढले. या दौऱ्यात त्यांनी सर्वच ठिकाणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अभूतपूर्व गर्दी करत आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला. ३ नोव्हेंबर रोजी होणारे हे आंदोलन केवळ एक दिवसाचे नसून बेमुदत असल्याने ती शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची ‘आरपारची लढाई’ असेल, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे. (Ishwarpur News)
सांगली जिल्ह्यातील ऊस पट्यातून प्रत्येक घरातील शेतकऱ्याने मंगळवारी सकाळी ११ वाजता किणी टोल नाक्यावर पूर्ण ताकदीनिशी आणि मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले. (Ishwarpur News)
स्वाभिमानी शेतकरी सघटनेचे भागवत जाधव, जगन्नाथ पाटील, नामदेव सावत, बाबासाहेब पाटील, शशिकांत पाटील, आनंद पाटील, आनंदराव निंबाळकर, बबन पाटील, बबन लोहार, सुशांत चौगुले, गौरव पाटील, संजय पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे, कार्यकर्ते आणि हजारो ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुक्यात झालेल्या या बैठकांच्या धडाक्यामुळे ३ नोव्हेंबरच्या आंदोलनाकडे आता संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. (Ishwarpur News)





