Rajpal Yadav : राजपाल यादवने जिंकली मनं.! ना VIP ट्रीटमेंट, ना खास एण्ट्री; सर्वसामान्यांसोबत रांगेत उभं राहून घेतलं लालबागचं दर्शन
गर्दीत काही भाविकांनी त्याला ओळखल्यानंतर त्याच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. राजपाल यादवनेही चाहत्यांना प्रतिसाद देत फोटो काढले आणि त्यानंतर बाप्पाच्या दर्शनासाठी पुढे गेला.

Rajpal Yadav : मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेशोत्सवात लाखो भाविकांची गर्दी होत असते. तासन्तास रांगेत उभं राहून बाप्पाच्या दर्शनाची प्रतीक्षा करणाऱ्या या गर्दीत सेलिब्रिटी दिसला की साहजिकच सर्वांचं लक्ष त्याच्याकडे जातं.
मात्र यंदा अभिनेता राजपाल यादवच्या दर्शनाची पद्धतच चर्चेचा विषय ठरली आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता असूनही राजपाल यादव सर्वसामान्य भाविकांसोबत रांगेत उभा राहिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं? (Rajpal Yadav)
राजपाल यादव नुकताच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचला. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तो इतर भाविकांसोबत रांगेत उभा असल्याचं दिसत आहे. यावेळी तो ‘गणपती बाप्पा मोरया..’चा जयघोष करताना दिसला.

Rajpal Yadav : राजपाल यादवने जिंकली मनं.! ना VIP ट्रीटमेंट, ना खास एण्ट्री; सर्वसामान्यांसोबत रांगेत उभं राहून घेतलं लालबागचं दर्शन
गर्दीत काही भाविकांनी त्याला ओळखल्यानंतर त्याच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. राजपाल यादवनेही चाहत्यांना प्रतिसाद देत फोटो काढले आणि त्यानंतर बाप्पाच्या दर्शनासाठी पुढे गेला.
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी यंदा प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी मुखदर्शनाची रांग तब्बल १० किलोमीटरपेक्षा अधिक लांब गेल्याचं वृत्त समोर आलं होतं. अशा परिस्थितीत राजपाल यादव सामान्य भाविकांच्या रांगेत उभा असल्याचं दृश्य सोशल मीडिया युजर्सच्या विशेष लक्षात आलं.
सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव.!
राजपाल यादवचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी त्याच्या साधेपणाचं कौतुक केलं. काही युजर्सनी त्याला ‘रिअल हिरो’ म्हटलं, तर काहींनी ‘VIP असावं तर राजपाल यादवसारखं’ अशा प्रतिक्रिया दिल्या. ‘Huge respect’ आणि ‘सामान्य भक्तांसोबत उभं राहणं आवडलं’ अशा प्रतिक्रियाही पाहायला मिळत आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सेलिब्रिटींपासून सर्वसामान्य भक्तांपर्यंत मोठी गर्दी होत असताना, राजपाल यादवचा हा व्हिडीओ ‘सेलिब्रिटी असूनही भक्तांच्या रांगेत’ या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.





