Rajnath Singh : एससीओ बैठकीसाठी राजनाथ सिंह ताजिकीस्तानला रवाना
ताजिकिस्तानमधील दुशान्बे येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या सरकार प्रमुखांच्या परिषदेच्या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

Rajnath Singh : ताजिकिस्तानमधील दुशान्बे येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या सरकार प्रमुखांच्या परिषदेच्या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या बैठकीसाठी ते आज दुशान्बे येथे रवाना झाले.
या बैठकीत एससीओ सदस्य देशांमधील बहुपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्यावर भर दिला जाणार आहे. विशेषतः व्यापार, अर्थव्यवस्था, गुंतवणूक, संपर्कव्यवस्था, नवोन्मेष तसेच सांस्कृतिक आणि मानवतावादी देवाणघेवाण या क्षेत्रांतील सहकार्यावर चर्चा होणार आहे.
याशिवाय, सुरू असलेल्या सहकार्य उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेणे आणि संघटनेच्या आर्थिक व संस्थात्मक कामकाजाशी संबंधित निर्णयांवर विचार करणे अपेक्षित आहे.
भारत एससीओच्या विविध यंत्रणांमध्ये सक्रिय सहभाग घेत असून, स्टार्टअप आणि नवोन्मेष, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा तसेच लोकांमधील परस्पर देवाणघेवाण यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून प्रादेशिक सहकार्यामध्ये योगदान देत आहे. या बैठकीमुळे (Rajnath Singh) संघटनेच्या चौकटीत व्यावहारिक आणि परस्पर लाभदायक सहकार्य पुढे नेण्याबाबत भारताला इतर एससीओ सदस्य देशांसोबत विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळणार आहे.
यापूर्वीची बैठक (Rajnath Singh) गेल्या वर्षी १८ नोव्हेंबर रोजी रशियातील मॉस्को येथे झाली होती. त्या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी केले होते.






