Sachin Pilgounkar : मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते सचिन पिळगावकर पुन्हा एकदा त्यांनी सांगितलेल्या एका किश्शामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे अनेक किस्से सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून, अनेकदा त्यांन ट्रोल केले जाताना दिसत आहे. आता त्यांच्या नवा किस्सा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. सोशल मीडियाव व्हायरल झालेल्या व्हिडीओत ज्येष्ठ निर्माते राजकुमार बडजात्या यांनी माझं गाणं ऐकलं आणि मगच त्यांनी अखेरचा श्वास घेतला, असा दावा सचिन पिळगावकर यांनी केला आहे. निर्माते राजकुमार बडजात्या हे आजारी होते. त्यांची तब्बेत खालावली होती. त्यांचा नातू त्यांच्यासोबत होता. त्यावेळी त्यांच्या नातवानं राजकुमार यांना विचारलं की, तुमची इच्छा काय आहे ? त्यावर ते म्हणाले की, मला सचिनचं ते ‘शाम तेरी बनसी पुकारे राधा नाम’ हे गाणं पाहायचं आहे, असे पिळगावकरांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, त्यानंतर त्यांना हे गाणे यूट्यूबवर दाखवण्यात आले. मग त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. हा संपूर्ण किस्सा सचिन पिळगाकर व्हिडीओत सांगताना दिसत आहेत. आता पिळगावकर यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. एका युजरने लिहिले, राजकुमार बडजात्यांचं निधन झालं, त्यावेळी मोबाईल होते का? तर दुसऱ्या एका युजरने हा माणूस नेहमी अशा लोकांबद्दल बोलतो की, जे हयात नाहीत, असे म्हटले आहेत. सतत किश्शांमुळे चर्चेत सचिन पिळगावकर हे मराठी सिनेइंडस्ट्रीतील मोठं नाव आहे. त्यांनी अनेक दर्जेदार सिनेमे मराठी सिनेविश्वाला दिलेले आहेत. काही सिनेमांचे त्यांनी दिग्दर्शन आणि निर्मितीही केली आहे. याशिवाय त्यांनी हिंदी सिनेइंडस्ट्रीत आपल्या नावाचा ठसा उमटला आहे. ‘नदिया के पार’, ‘बालिका वधू’, ‘पारध’, ‘बचपन’, ‘ब्रह्मचारी’, ‘सत्ते पे सत्ता’ या सिनेमातील त्यांच्या अभिनयाची दखल त्यांनी प्रेक्षकांना घ्यायला भाग पाडले. पण सध्या सचिन पिळगावकर त्यांच्या किस्सांमुळे चर्चेत असतात. हेही वाचा : ऐन दिवाळीत पावसाची एन्ट्री अन् नागरिकांची उडाली तारांबळ, आता पुढचे 4 दिवस पावसाचे….