राजकोट गेमिंग झोनला लागलेल्या आगीत मालकाचाही होरपळून मृत्यू; DNA चाचणीनंतर समोर आली माहिती

Rajkot Game Zone Fire| गुजरातमधील राजकोट येथे टीआरपी गेम झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीत 28 जणांचा होरपळून मृत्यू झाला. यात लहान मुलांचाही समावेश होता. या आगीत मृत्यू झालेल्या व्यक्तींची ओळख पटवणे देखील कठीण होते.
त्यामुळे DNA चाचणीच्या मदतीने अनेकांची ओळख पटवण्यात आले. यातच आता या घटनेनंतर आणखी एक माहिती समोर आली आहे. या भीषण आगीत गेमिंग झोनचे मालक (पार्टनर) प्रकाश हिरण यांचाही मृत्यू झाला आहे. डीएनए चाचणीतून ही माहिती समोर आली आहे.
या आगीत गेम झोनचे मालक प्रकाश हिरण यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या अवशेषांचे DNA नमुने आईशी जुळल्यामुळे त्यांची ओळख पटली. आग लागली त्यावेळी प्रकाश हिरण हे देखील सीसीटीव्हीत कैद झाले होते. आगीच्या घटनेनंतर त्यांचा कुटुंबाशी संपर्क झाला नाही, त्यांचा फोनही बंद होता. यानंतर प्रकाश यांचा भाऊ जितेंद्रने पोलिसांकडे डीएनए चाचणीसाठी निवेदन दिले आणि डीएनए चाचणीचा नमुना एका मृतदेहाशी जुळला.
आग कशामुळे लागली? Rajkot Game Zone Fire|
गुजरातमधील राजकोट जिल्ह्यातील कलावद येथील गेमिंग झोनमध्ये ही दुर्घटना घडली आहे. विकेंड असल्यामुळे अनेक कुटुंबे आपल्या मुलांसह गेम झोनमध्ये गेली होती. गेमिंग झोनमध्ये अचानक आग लागल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. ही आग इतकी भीषण होती, तिचे पाच किलोमीटर अंतरापर्यंत धुराचे लोट दिसत होते.
त्यानंतर गेमिंग झोनमधील एक सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. त्यात पहिल्या मजल्यावर एका ठिकाणी वेल्डिंगचे काम सुरू होते. त्याच्या खाली फोम शीट, प्लास्टिकचे साहित्य आणि मोठ्या प्रमाणात थर्माकोलच्या शीट व इतर साहित्य ठेवले होते. त्यावर वेल्डिंगच्या ठिणग्या पडल्या आणि त्यामुळे आग लागली. यावेळी कर्मचाऱ्यांना आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र काही वेळात आगीने रौद्ररुप धारण केले आणि यात 28 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. Rajkot Game Zone Fire|
हेही वाचा:
“प्रज्वल रेवन्ना यांना भारतात येताच अटक केली जाणार”; कर्नाटकच्या मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका





