पुणे जिल्हा | राजगुरूनगर ते पुणे स्टेशन पीएमपी पुन्हा सुरू

राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – राजगुरुनगर ते पुणे स्टेशन बस सेवा सुरू झाली याचा मनस्वी आनंद होत आहे. गेली काही वर्षांपासून बंद असलेली राजगुरूनगर ते पुणे स्टेशन ही बस सेवा पुन्हा सुरू झाल्याने विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला चांगली सेवा पुन्हा उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले.
आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी शुक्रवारी (दि. 4) पहिल्या बसेसला हिरवा झेंडा दाखवून वाहिली बस सोडण्यात आली. यावेळी जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी युवक काँग्रेस अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, दिलीप बनसोडे, वैभव घुमटकर,
सागर सातकर, रवी गुजराथी, विष्णू बोर्हाडे, राम कडुसकर, हर्षदा गाढवे, निसार सय्यद, नागेश्वर पांचाळ, अविनाश गारगोटे, विकास वाळुंज, ओंकार घनवट, अनिकेत माशेरे, ओंकार सूर्यवंशी, अभिलाष गोतारणे यांच्यासह विद्यार्थी, प्रवाशी नागरिक उपस्थित होते.
राजगुरूनगर ते पुणे बस सेवा चाकण मराठा आंदोलनापासून बंद होती. पुणे येथे जाणार्या विद्यार्थी नोकरदार आणि सर्वसामान्य प्रवाशी यांना याचा मोठा फटका बसला होता.
ही बस सेवा सुरू करण्यासाठी अनेक संस्था संघटना आणि राजकीय पक्षाच्या पदाधिकार्यांनी यासाठी प्रयत्न केले होते
मध्यंतरी अजित पवार यांच्या खेड दौर्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले होते त्याच क्षणी व्यासपीठावरून अजित पवार यांनी तात्कळ बस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी पीएमपीएमएलच्या अधिकर्यांची बैठक घेत राजगुरुनगर ते पुणे स्टेशन बस सेवा सुरू केली.
राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी युवक काँग्रेसच्या वतीने अजित पवार आणि संबंधित पीएमपीएमएलच्या अधिकर्याना आदेश दिल्यानंतर खेड तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी पीएमपीएमएलचे मुख्य संचालक दीपा मुंडे, मुख्य वाहतूक अधिकारी सतीश गव्हाणे,
भोसरी डेपोचे मॅनेजर विजय मेदगे याची भेट घेऊन राजगुरूनगर ते पुणे स्टेशन बस सेवा सुरु करण्यासाठी चर्चा केली होती. जसजसे बसकडे प्रवासी वाढतील तस तशा जास्त बसेस सोडण्याच्या निर्णय पीएमपीएमएल प्रशासानाने घेतला आहे.
राजगुरूनगर येथून बसेस सुटण्याच्या वेळा
सकाळी : 7, 7.55
दुपारी : 3.30, 4.10
चौकट : पुणे स्टेशनवरून सुटणार्या बसेस
सकाळी : 9.35, 10.30
सायंकाळी : 5.35, 6.35





