Rajgurunagar rain news : भीमा नदीच्या पुरात बुडाली वॅगनआर गाडी; एकजण बुडाल्याची भीती

Rajgurunagar rain news : टोकेवाडी (कडूस), ता. खेड येथील चासकडे जाणाऱ्या मोरी पुलावरून वॅगनआर गाडी भीमा नदीच्या पुराच्या पाण्यात बुडाली. त्यात एक जण बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे. खेड तालुक्यात शनिवारी (दि. २७) रात्री पासुन रविवारी (दि. २८) दुपार पर्यंत जोरदार पाऊस झाला. चासकमान धरण परिसरात पावसाचा जोर वाढला होता. नद्या नाले भरून वाहत होते. तर भीमा नदीला पूर आला होता.
अशातच धरणातून रविवारी दुपारी ३० हजार क्युसेक वेगाने नदीपात्रात पाणी सोडण्यात येत होते. चास येथे भीमा नदी दुथडी भरुन वाहत होती. पुराच्या पाण्याचा मोठा प्रवाह सुरू असताना कडूसच्या टोकेवाडी बाजूकडून एक वॅगनआर आली आणि वेगात पाण्यात गेली.
काही वेळ ती तरंगली मात्र पाण्यात बुडुन खड्यात अडकली. त्यात चालक असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. स्थानिक नागरिकांनी गाडी पाण्यात तरंगत असताना त्यातील दोघांना वाचवण्यासाठी पाण्यात उड्या मारल्या. मात्र पुराचा वेग वाढला असल्याने जवळ जाईपर्यंत गाडी बुडाली होती.





