Rajeshwari Kharat : फॅण्ड्री फेम ‘शालू’ने बदलला धर्म! नेटकरी झाले अभिनेत्रीवर नाराज…

Rajeshwari Kharat : ‘फॅन्ड्री’ या सिनेमामुळे घराघरात पोहोचलेली शालू म्हणजेच अभिनेत्री ‘राजेश्वरी खरात’ने धर्मांतर केलं. सोशल मीडियावर तिने याचे फोटो शेअर करत ही महत्वाची बातमी चाहत्यांना दिली. तिच्या या कृतीने अनेकांना धक्का बसला असल्याचं दिसून येत आहे.
फॅंड्री मधील दमदार भूमिकेमुळे ही अभिनेत्री चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आली होती. तिचे सोशल मीडियावर देखील लाखो फॉलोवर्स आहेत. दरम्यान, आता ही अभिनेत्री एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.
राजेश्वरी खरातने नुकतंच धर्मांतर केलं आहे. याचे फोटो स्वतः तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. ‘कारण तुमच्यासाठी माझ्या योजना मला माहीत आहेत, असं परमेश्वर म्हणतो,’ असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. या फोटोंमध्ये राजेश्वरीसोबत तिच्या कुटुंबीयांनीही धर्मांतर केल्याचं पहायला मिळतंय.
View this post on Instagram
राजेश्वरीसह तिच्या कुटुंबीयांनीही पांढरे कपडे परिधान करत ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. रविवारी ‘ईस्टर संडे’ होता, त्यानंतर राजेश्वरीची ही पोस्ट चर्चेत आली आहे. फोटोमध्ये ती पाण्यात उभी असून तिच्या डोक्यावर धर्मगुरूंचा हात दिसत आहे.
अनेक चाहत्यांना तिच्या या कृतीने धक्का बसला. या फोटोवर कमेंट करत अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 2013 मध्ये नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा चित्रपट खूप गाजला आणि त्यातील जब्या- शालू यांचीदेखील खूप चर्चा झाली. त्यानंतर तिने ‘पुणे टू गोवा’ आणि ‘आयटमगिरी’ (2017) या चित्रपटांमध्येही काम केले .





