Dahiwadi : दहिवडीच्या प्रभारी नगराध्यक्षपदी राजेंद्र साळुंखे यांची नियुक्ती

दहिवडी : दहिवडी नगरपंचायतीचे प्रभारी नगराध्यक्ष म्हणून विद्यमान उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे यांना पदभार मिळाला. त्यांच्या निवडीमुळे सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
दहिवडी नगरपंचायतीचे मा. नगराध्यक्ष सागर पोळ यांच्यावर सर्वपक्षीय नगरसेवकांकडून दोनदा अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. अखेर २९ एप्रिलला प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या उपस्थितीत हा ठराव १४- ० ने मंजूर झाल्यावर सागर पोळ यांना पदावरून पायउतार व्हावे लागले.
19 मे रोजी नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार असुन तोपर्यंत नगराध्यक्षपदाचा प्रभारी कार्यभार उपनगराध्यक्ष राजेंद्र यांच्याकडे राहिल हे जाहीर करण्यात आले. 19 मे रोजी होणाऱ्या नगराध्यक्ष निवडीत राजेंद्र साळुंखे आपल्या पदावर कायम राहणार की इच्छुक नगरसेवकांमध्ये नगराध्यक्ष पदासाठी रस्सीखेच असणार हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.





