Rajendra Nimbalkar : राजेंद्र निंबाळकर सारथीचे नवे संचालक

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या सतत होताना दिसत आहेत. आताही सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यात राजेंद्र निंबाळकर यांची सारथीच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर राजेंद्र भारुड यांची रुसाच्या प्रकल्प संचालकपदावर बदली करण्यात आली आहे.
कोणाची बदली कुठे झाली?
1. राजेंद्र निंबाळकर (आयएएस 2007 बॅच) व्यवस्थापकीय संचालक, एमएसएशआयडीसी, मुंबई यांची व्यवस्थापकीय संचालक, सारथी, पुणे म्हणून नियुक्ती.
2. संजय यादव (आयएएस 200९ बॅच) जिल्हाधिकारी, मुंबई शहर, मुंबई यांची राज्य प्रकल्प संचालक, समग्र शिक्षा अभियान, मुंबई म्हणून नियुक्ती.
3. डॉ. राजेंद्र भारुड (आयएएस २०१३ बॅच) आयुक्त, टीआरटीआय, पुणे यांना प्रकल्प संचालक, रुसा, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, मुंबई म्हणून नियुक्ती.
4. दीपक कुमार मीना (आयएएस २०१३ बॅच) अतिरिक्त आदिवासी आयुक्त, ठाणे यांची सहआयुक्त, राज्य कर, मुंबई म्हणून नियुक्ती.
5. समीर कुर्तकोटी (आयएएस २०१३ बॅच) यांची आयुक्त, टीआरटीआय, पुणे म्हणून नियुक्ती.
6. महेश आव्हाड (आयएएस २०१५ बॅच) व्यवस्थापकीय संचालक, हाफकीन बायोफार्मा, यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण, मुंबई म्हणून नियुक्ती.
7. कीर्ती किरण पुजार (आयएएस २०१८ बॅच) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी यांची जिल्हाधिकारी, धाराशिव म्हणून नियुक्ती.



