\n

विधान परिषद ते राज्यसभा –  (Rajya Sabha)

\n

पक्षाने त्यांच्या संघटनात्मक कौशल्याची दखल घेत त्यांना भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेत पाठविले होते. आमदार म्हणून त्यांनी ग्रामीण विकास, सिंचन, शिक्षण आणि पायाभूत सुविधांशी संबंधित प्रश्न सातत्याने मांडले.

\n
\"Rajendra

Rajya Sabha : सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागेवर राज्यसभेसाठी एनसीपीकडून अखेर राजेंद्र जैन यांनी भरला अर्ज उमेदवारी अर्ज

\n

 

\n

२०१६ मध्ये भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीत भाजपचे परिण फुके यांनी त्यांचा निसटता पराभव केला होता. मात्र या पराभवानंतरही पक्षातील त्यांचे राजकीय वजन कायम राहिले.  (Rajya Sabha)

\n

विदर्भातील राष्ट्रवादीचे ‘संकटमोचक’-

\n

राष्ट्रवादी काँग्रेसमधील विविध राजकीय घडामोडी, पक्षफुटी आणि संघटनात्मक आव्हानांच्या काळात पूर्व विदर्भात पक्षाची ताकद टिकवून ठेवण्यात राजेंद्र जैन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत ठेवणे, स्थानिक नाराजी हाताळणे आणि पक्षाशी कार्यकर्त्यांना जोडून ठेवणे यासाठी ते ओळखले जातात.

\n

शिक्षण क्षेत्रातही ठसा-

\n

राजकारणाबरोबरच शिक्षण क्षेत्रातही जैन यांचे योगदान लक्षणीय मानले जाते. गोंदिया एज्युकेशन सोसायटीचे सचिव म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले असून ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत.

\n

निष्ठेला मिळाले फळ-

\n

राजकीय विश्लेषकांच्या मते, राज्यसभेची उमेदवारी ही राजेंद्र जैन यांच्या दीर्घकालीन निष्ठा, संघटनात्मक कामगिरी आणि पक्षासाठीच्या योगदानाची दखल आहे. प्रसिद्धीपासून दूर राहून पडद्यामागे संघटना उभी करणाऱ्या नेत्याला पक्षाने राष्ट्रीय राजकारणात संधी दिल्याचे मानले जात आहे.

\n

राजेंद्र जैन यांना राज्यसभेत पाठवून राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भाला प्रतिनिधित्व देण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे. पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि मराठवाडा केंद्रित राजकारणात पूर्व विदर्भातील एका संघटनात्मक नेत्याला दिल्लीत पाठविण्याचा निर्णय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.

\n

स्वीय सहाय्यकापासून राज्यसभेपर्यंतचा प्रवास करणारे राजेंद्र जैन आता राष्ट्रीय राजकारणात आपली छाप उमटविण्यास सज्ज झाले आहेत.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Rajya Sabha : सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागेवर राज्यसभेसाठी एनसीपीकडून अखेर राजेंद्र जैन यांनी भरला अर्ज उमेदवारी अर्ज","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/06/rajendra-jain.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/dnyaneshwarphadeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/rajendra-jain-filed-nomination-for-rajya-sabha-ncp#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/06/rajendra-jain.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/rajendra-jain-filed-nomination-for-rajya-sabha-ncp#webpage","name":"Rajya Sabha : सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागेवर राज्यसभेसाठी एनसीपीकडून अखेर राजेंद्र जैन यांनी भरला अर्ज उमेदवारी अर्ज","url":"https://www.dainikprabhat.com/rajendra-jain-filed-nomination-for-rajya-sabha-ncp","inLanguage":"mr","description":"Rajya Sabha : स्वीय सहाय्यकापासून राज्यसभेपर्यंतचा प्रवास करणारे राजेंद्र जैन आता राष्ट्रीय राजकारणात आपली छाप उमटविण्यास सज्ज झाले आहेत.","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/rajendra-jain-filed-nomination-for-rajya-sabha-ncp#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/06/rajendra-jain.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/rajendra-jain-filed-nomination-for-rajya-sabha-ncp#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/rajendra-jain-filed-nomination-for-rajya-sabha-ncp","name":"Rajya Sabha : सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागेवर राज्यसभेसाठी एनसीपीकडून अखेर राजेंद्र जैन यांनी भरला अर्ज उमेदवारी अर्ज"}}]}}}

Rajya Sabha : सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागेवर राज्यसभेसाठी एनसीपीकडून अखेर राजेंद्र जैन यांनी भरला अर्ज उमेदवारी अर्ज

Rajya Sabha : सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागेवर राज्यसभेसाठी एनसीपीकडून अखेर राजेंद्र जैन यांनी भरला अर्ज उमेदवारी अर्ज - Dainik Prabhat