पुणे जिल्हा | राजे नागरी पतसंस्था हे युवकांचे एक उत्तम संघटन

नारायणगाव, (वार्ताहर) – राजे नागरी सहकारी पतसंस्था तरुणांच्या संघटनेचे एक उत्तम उदाहरण असून पतसंस्थेसाठी सभासदांनी सहकार्य करावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे युवा नेते अमित बेनके यांनी केले.
राजे नागरी सहकारी पतसंस्थेची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष जुबेर शेख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अमित बेनके बोलत होते.
यावेळी नारायणगावचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, माऊली खंडागळे, विजय गुंजाळ, मेहबूब काझी, गणेश वाजगे, मुबारक मुजावर, ज्योती संते, नारायणगाव ग्रामपंचायत सदस्य जुबेर आतार, माजी मुख्याध्यापक हरिश्चंद्र नरसुडे, सुधाकर लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र राज्य सहकार बोर्डाचे प्रशिक्षण अधिकारी हुसेन तांबोळी यांनी उपस्थित संचालक व सभासदांना सहकार कायदा व पतसंस्थेच्या नवीन धोरणांविषयी प्रशिक्षण दिले. वारुळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय भेटवस्तू देऊन तर संस्थेच्या सभासदांना झाडे वाटप करून सन्मान करण्यात आला.
यासाठी संस्थेचे सभासद निखिल भोर, मुन्ना काझी, अझरुद्दीन शेख, संजय थोरवे, वनविभागीय अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
पतसंस्था नवीन असल्याने वार्षिक सभेच्या कार्यक्रमाचा खर्च जितेंद्र अडसरे, योगेश गायकवाड, शैला वाव्हळ, संजय वारुळे, पंकज भालेराव, विक्रांत मेहेर, सकलेन आतार, नवनाथ पोकळे, सुशील सोनवणे, विशाल गोरडे, सीमा औटी, निलेश रसाळ संचालकांनी स्वनिधीतून केला.
दिनेश मेहेर, गौतम औटी, मुन्ना काझी, मोहसीन शेख, अमोल कुदळे, स्वप्निल भुजबळ, जावेद शेख यांनी सभा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी योगदान दिले.
तर विजय भूमकर, अस्लम शेख,आशिष वाजगे, संजय आरोटे सभासदांनी चर्चेत सहभाग घेतला.सूत्रसंचालन डॉ.सत्यवान थोरात व गौरी बेनके यांनी तर प्रियंका रासकर यांनी आभार मानले.
पतसंस्थेची आर्थिक स्थिती
अधिकृत भाग भांडवल : 11 लाख 80 हजार 400 रुपये
स्व निधी : 8 हजार 740 रुपये
ठेवी : 85 लाख रुपये
कर्ज वाटप : 62 लाख 41 हजार 500 गुंतवणूक 25 लाख 48 हजार रुपये
स्थावर मालमत्ता : 3 लाख 76 हजार 590 रुपये





