#IPL 2022 | बटलरची विक्रमाला गवसणी
Updated On:

पुणे – राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर फलंदाज जोस बटलर याने एक नवा विक्रम साकार केला आहे. त्याने आयपीएल स्पर्धेत 2 हजार धावांचा टप्पा पार केला आहे.
मंगळवारी पुण्यात झालेल्या सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना बटलरने 3 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 28 चेंडूत 35 धावांची खेळी केली तेव्हा त्याने हा पल्ला पार केला. अशी कामगिरी करणारा इंग्लंडचा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. बटलरने 66 सामन्यात 65 डावात 2003 धावा केल्या आहेत.





