Sandeep Sharma : राजस्थानला मोठा धक्का! स्टार वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे IPL 2025 मधून बाहेर

RR vs MI Sandeep Sharma ruled out from IPL 2025 : गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज संदीप शर्मा जखमी झाला होता. बोटाला दुखापत असूनही त्याने सामन्यात गोलंदाजी सुरू ठेवली. आता तो आयपीएल २०२५ च्या संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. या कारणास्तव, मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्याच्या जागी आकाश माधवालला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे.
संदीप शर्माच्या बोटाला दुखापत –
राजस्थान रॉयल्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये संदीप शर्मा बोटावर प्लास्टर लावून स्टेडियममध्ये प्रवेश करताना दिसत आहे. राजस्थानने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, बोटात फ्रॅक्चर असूनही संघासाठी आपला स्पेल पूर्ण करण्यासाठी आपले शरीर पणाला लावणाऱ्या या योद्ध्यासाठी टाळ्या वाजवा. संदीप, लवकर बरा हो आणि पुन्हा मजबूत हो.
Rajasthan Royals bowler Sandeep Sharma has been ruled out for the rest of the season after suffering a fracture in his finger.
He picked up the injury in RR's victory over Gujarat Titans a few days ago.#IPL2025 #CricketNews pic.twitter.com/AqCBMIuwKu
— Sportstar (@sportstarweb) May 1, 2025
राजस्थान रॉयल्सने जारी केलेल्या निवेदनात असे सांगण्यात आले आहे की, बोटाच्या दुखापतीमुळे संदीप शर्मा आयपीएल २०२५ मधून बाहेर पडला आहे. फ्रँचायझीमधील प्रत्येकजण त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहे. संघ व्यवस्थापन त्याच्या जागी खेळाडू निवडण्याचे काम करत आहे, ज्याची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल.
हेही वाचा – Rohit Sharma : ‘६०० धावा करण्याचा काय उपयोग, जर ट्रॉफी नसेल…’, हिटमॅनने RCBच्या चाहत्यांना डिवचलं
संदीप शर्माच्या दुखापतीबद्दल अपडेट देताना राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग म्हणाला की, संदीप भाईचे बोट तुटले आहे. यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल केले आहेत. चालू हंगामात संदीपने एकूण १० सामने खेळले आहेत, ज्यात त्याने ९ विकेट्स घेतल्या आहेत. गेल्या दोन हंगामात राजस्थान रॉयल्सकडून संदीप शर्माने शानदार कामगिरी केली होती. त्याच्याकडे अनुभव आहे आणि तो डेथ ओव्हर्समध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. आतापर्यंत त्याने १३७ आयपीएल सामन्यांमध्ये एकूण १४६ विकेट्स घेतल्या आहेत.





