Rajasthan News : राजस्थानमध्ये केमिकल कारखान्यात भीषण स्फोट; 8 कामगारांचा मृत्यू
राजस्थानमधील (Rajasthan News) भिवाडी येथे एका केमिकल कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटामध्ये आठ कामगार जिवंत जळाले, तर चार जण गंभीर भाजले आहेत. सकाळी साडे नऊ च्या सुमारास खुशखेडा करौली औद्योगिक क्षेत्रात ही घटना घडली.

Rajasthan News : राजस्थानमधील (Rajasthan News) भिवाडी येथे एका केमिकल कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटामध्ये आठ कामगार जिवंत जळाले, तर चार जण गंभीर भाजले आहेत. सकाळी साडे नऊ च्या सुमारास खुशखेडा करौली औद्योगिक क्षेत्रात ही घटना घडली.
या कारखान्यात बेकायदेशीर फटाके बनवले जात होते. घटनास्थळावरून गनपावडर, फटाके आणि पॅकिंग कंटेनर जप्त करण्यात आले आहेत. स्फोट झाला त्यावेळी कारखान्यात सुमारे 25 कामगार होते. स्फोटात मृतदेह गंभीरपणे जळाले होते, फक्त अनेकांचे सांगाडे शिल्लक होते.
कारखान्याच्या मालकाचे नाव राजेंद्र आहे.याठिकाणी प्राथमिक तपासात असे दिसून आले की, युनिटकडे रेडीमेड कपड्यांचा परवाना होता आणि आत बेकायदेशीर लहान स्फोटके आणि फटाके सापडले आहेत. एफएसएल टीमला घटनास्थळी बोलावण्यात आले आहे. सखोल चौकशीनंतर कारण कळेल, असे भिवाडीचे अतिरिक्त एसपी अतुल साहू म्हणाले.





