“कोट्यवधींची संपत्ती, महागड्या गाड्या…”; ठाकरेंकडून मैदानात उतरलेल्या राजन विचारेंची संपत्ती नेमकी किती? वाचा सविस्तर

Rajan Vichare Wealth । राज्यात विधानसभा निवडणूक लागल्यानंतर प्रत्येक पक्षाकडून आपापल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात येत आहे. त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून राजन विचारे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. राजन विचारे यांनी गुरुवारी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.
राजन विचारे हे 2009 मध्ये ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ठाकरे गटाने माजी खासदार राजन विचारे यांनाच ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. उमेदवारी अर्ज भरताना राजन विचारे यांनी आपल्या संपत्तीचे विवरणपत्र दिले आहे. त्यानुसार राजन विचारे यांच्याकडे जवळपास 26 कोटी रुपयांची संपत्ती आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राजन विचारे यांच्या कर्जात वाढ झाल्याचे देखील दि१ सून येत आहे.
राजन विचारेंची संपत्ती किती?
एकूण संपत्ती – 25,82,97,000
2024 लोकसभेत असलेली एकूण संपत्ती : 25,82,97,000)
राजन विचारे यांची संपत्ती लोकसभेइतकीच असल्याचे दिसून येत आहे.
दाखल गुन्हे – 06
वाहने – राजन विचारे यांच्याकडे हुंदाई वेरणा, पत्नी नंदीनीच्या नावे इनोव्हा क्रीस्टा, महिंद्रा स्कॉर्पिओ.
शेती – रत्नागिरी येथील पोमेंडी आणि अलिबाग येथील अक्शी येथे शेतजमीन.
सदनिका – ठाण्यातील चरई भागातील रोझ वुड, दिघे चौकात दुकान, मिरा-भाईंदर येथील गौरव गार्डन येथे दोन दुकान, पत्नी नंदिनीच्या नावे जांभळीनाका येथील आत्माराम टॉवरमध्ये दुकान, चेंदणी येथील ठाकूर निवासमध्ये दुकान.
राजन विचारे यांची मालमत्ता – (2019 सालची)Rajan Vichare Wealth ।
* एकूण संपत्ती – 14,59,80,198
* जंगम मालमत्ता – 2,01,15,200
* पत्नी नंदिनी – 2,82,93,363
* रोख रक्कम – 2,00,000
* वारसा हक्काने – 9,00,000
* कर्ज – 4,18,57,461
* गुन्हे – 9 फौजदारी गुन्हे
* वाहने – फोर्ड एंडेवर, मर्सिडीज बेंझ,
* पत्नी नंदीनीच्या नावे- टोयोटा फोर्चुनर, इनोव्हा क्रीयस्टा, महिंद्रा स्कॉर्पिओ.
* शेती – रत्नागिरी येथील पोमेंडी आणि अलिबाग येथील अक्शी येथे शेतजमीन.
* सदनिका – ठाण्यातील चरई भागातील रोझ वुड आणि जय जगदंबा अपार्टमेंटमध्ये दुकान, पत्नी नंदिनीच्या नावे जांभळीनाका येथील आत्माराम टॉवरमध्ये दुकान, जय जगदंबा अपार्टमेंटमध्ये दुकान, चेंदणी येथील ठाकूरनिवासमध्ये दुकान.





