राजन साळवी ‘धनुष्यबाण’ घेणार हाती; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश करणार

Rajan Salvi | उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देत अखेर राजन साळवी हे आज एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मागील काही दिवसांपासून राजन साळवी हे नाराज असल्याच्या चर्चा समोर येत होत्या. यातचे ते उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार असल्याचे देखील म्हंटले जात होते. अखेर राजन साळवी यांनी बुधवारी ठाकरे पक्षातील उपनेतेपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज (गुरुवार) दुपारी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
शक्तीप्रदर्शनासह साळवींचा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडणार
राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशासाठी साळवींचे समर्थक मोठ्या संख्येने रात्रीच मुंबईत दाखल झाले आहेत. ठाण्यातील टेंभीनाका परिसरातील आनंदाश्रमात शक्तीप्रदर्शन करत राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडणार आहेत.
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का
मात्र राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. मिरा भायंदरमधील शिवसेना ठाकरे गटाच्या तीन माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. माजी नगरसेविका शर्मिला बगाजी, माजी नगरसेवक बर्नड डिमेलो आणि माजी नगरसेवक जार्जी गोविंद यांनी मंत्री प्रताप सरनाईक आणि माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे.
राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे, मात्र त्यापूर्वीच या माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. Rajan Salvi |
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं चांगली कामगिरी केली होती. यामुळे महायुतीचा मोठा पराभव झाला. मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. महायुतीनं राज्यात 232 जागा जिंकल्या. महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर महाविकास आघाडीमधील अनेक नेते हे आता शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.
राजन साळवींना विधान परिषदेवर संधी?
आज शिवसेना ठाकरे गटाचे बडे नेते राजन साळवी हे गुरुवारी दुपारी तीन वाजता ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हाप्रमुख, आमदार आणि उपनेते अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. त्यांना विधान परिषदेवर संधी मिळण्याची शक्यता आहे. Rajan Salvi |
सामंत बंधू आणि राजन साळवी यांच्यातील अंतर्गत वाट मिटला
राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशापूर्व बुधवारी रात्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी उदय सामंत, किरण सामंत आणि राजन साळवी यांची बैठक पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी सामंत बंधू आणि राजन साळवी यांच्यातील अंतर्गत वाट मिटवून या दोघांमध्ये समेट घडवून आणला. ही बैठक संपल्यानंतर किरण सामंत आणि राजन साळवी हे एकाच गाडीतून बाहेर पडले.
हेही वाचा :





