Raj Thackeray : व्यंगचित्रातून राज ठाकरेंचा अमित शाह अन् जय शाहांवर जोरदार हल्लाबोल, नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray : आशिया चषकातील १४ सप्टेंबर रोजीच्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला विरोध दर्शवण्यात आला होता. मात्र, तरीही हा सामना दुबईत खेळवला गेला. शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या सामन्याला तीव्र शब्दांत विरोध दर्शवला. उबाठा सेनेने राज्यभरात याविषयी निषेधही व्यक्त केला. राऊतांनी यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीकेची झोड उठवली होती. तसेच अनेक सवालही त्यांनी या सामन्याच्या पार्श्वभूमीवर उपस्थित केले होते.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे भारतानं पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशी लोकभावना होती. मात्र, बीसीसीआयने परवानगी दिल्यानंतर हा सामाना खेळवण्यात आला. अशातच आता भारत पाक क्रिकेट सामन्यावरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह आणि जय शाह यांच्यावर व्यंगचित्राच्या माध्यमातून हल्लाबोल केला आहे.
व्यंगचित्राच्या माध्यमातून राज ठाकरेंनी दोघांचेही प्रतिकात्मक व्यंगचित्रे काढली आहे. यातून राज ठाकरेंनी बीसीसीआय आणि आयसीसीवर टीका केली आहे. अरे बाबांनो उठा…आपण जिंकलो, पाकिस्तानी हरले…असं म्हणत नक्की कोण जिंकलं? आणि नक्की कोण हरलं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच या व्यंगचित्रातून आयसीसी आणि गृह मंत्रालयावर भाष्य करण्यात आलं आहे. या व्यंगचित्रात पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले भारतीय लोकही दिसत आहेत.
#पहलगाम #काश्मीर #PahalgamAttack #BCCI #ICC #AsiaCup #INDvsPAK#Cricket pic.twitter.com/ASx9fpB81Y
— Raj Thackeray (@RajThackeray) September 17, 2025





