विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे पुन्हा उतरणार मैदानात; उद्यापासून नाशिक दौऱ्यावर

Raj Thackeray | मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्वबळावर विधानसभा निवडणूक लढली होती. मात्र यात त्यांना खातेही उघडता आले नाही. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे उद्या अर्थात 23 जानेवारीपासून पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत. ते नाशिक येथे तीन दिवस मुक्कामी राहणार आहेत.
या दौऱ्यादरम्यान ते पक्षाच्या विविध पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. या शिवाय आगामी महापालिका निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्त्यांना सूचना देखील देणार असल्याचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यादृष्टीने पक्षाला पुन्हा ऊर्जा देण्यासाठी राज ठाकरेंचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. विशेष म्हणजे नाशिक हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला होता. Raj Thackeray |
2012 च्या महापालिका निवडणुकीत नाशिकमध्ये 40 नगरसेवक निवडून आले होते. 2012 ते 2027 या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महापौर होता. मात्र पक्षातील अंतर्गत गटबाजीनंतर अनेक मोठे नेत्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. याचा मोठा फटका 2017 च्या महापालिकेच्या निवडणूकीत बसला. त्यामुळे आता राज ठाकरे आगामी महापालिका निवडणुकीच्या कशी रणनिती आखणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. Raj Thackeray |
हेही वाचा:
वाल्मिक कराडचे पाय खोलात, तर मुलाला दिलासा; ‘त्या’ प्रकरणातील फिर्याद सोलापूर न्यायालयाने फेटाळली





