Raj Thackeray | राज्यात मागील काही दिवसांपासून हिंदी भाषेच्या मुद्यावरून वाद वाढला आहे. अलिकडेच राज ठाकरे यांनी मीरा रोड येथे सभा घेत आक्रमक भूमिका घेतली. या सभेदरम्यान त्यांनी सरदार वल्लभभाई पटेलांचा आणि मोरारजी देसाई यांचा उल्लेख करत टीका केली. यावरुन आता गुजरातमधील नेत्यांनी टीका केली आहे. राज ठाकरे यांनी सरदार पटेलांचा अपमान केल्याचे म्हणत पाटीदार नेते अल्पेश कथिरिया यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंनी याप्रकरणी माफी मागावी अशी अल्पशे कथिरिया यांनी केली. राज ठाकरे यांनी जनतेची जाहीर माफी मागावी राज ठाकरे यांनी जनतेची जाहीर माफी मागावी. राज ठाकरे गुजराती आणि मराठी लोकांमध्ये भांडणे लावण्याचे काम करत आहेत. आतापर्यंत मनसे अस्तित्वात नव्हती, आता ते उभे राहण्याचा प्रयत्न करताना सरदार पटेलांचा अपमान करत आहेत. सरदार साहेब आणि मोरारजी देसाई यांना लक्ष्य करणे म्हणजे तणाव पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. असे राजकीय स्टंट आम्ही सहन करणार नाही,” असं अल्पेश कथिरिया म्हणाले. काय म्हणाले राज ठाकरे? “मुंबई महाराष्ट्रापासून बाजूला करण्याचा डाव काही गुजराती व्यापाऱ्यांचा आणि गुजराती नेत्यांचा होता. मी एकदा आचार्य अत्रेंचं पुस्तक वाचत होतो तेव्हा मला धक्का बसला. सरदार वल्लभभाई पटेल यांनी सर्वप्रथम सांगितलं की मुंबई महाराष्ट्राला देऊ नका. मोरारजी देसाई यांनी मराठी माणसावर गोळीबार केला होता. ज्यांना आम्ही लोहपुरुष म्हणून मानत आलो त्यांनी असं सांगितलं. आम्ही त्यांच्याकडे आदराने पाहत आलो. पण त्यांनी महाराष्ट्राला विरोध केला,” असं राज ठाकरे म्हणाले. हेही वाचा: Aditya Thackeray : मुख्यमंत्री अन् आदित्य ठाकरेंच्या भेटीची चर्चा; आता एक व्यक्ती गावी जाईल! आदित्य ठाकरेंनी कुणावर साधला निशाणा?