राज ठाकरेंची ‘राज’गर्जना! सुनेत्रा पवारांचा शपथविधी होताच डिवचलं; राष्ट्रवादीच्या नेतृत्वावरून थेट भाष्य
Raj Thackeray : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एक खळबळजनक पोस्ट केली आहे

Raj Thackeray : राष्ट्रवादी पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही, अशी पोस्ट करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाव न घेता खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधला आहे.
ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे. त्यावरती खरे तर भाष्य करावे असे वाटत नाही. पण, तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावेच लागेल.
राष्ट्रवादी पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, आज सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड झाली आहे.
त्यानंतर सायंकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे अजित पवार यांच्यानंतर इथून पुढे सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर पक्षाची धुरा असणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आज सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहील्या महीला उपमुख्यमंत्री त्यांनी शपथ घेतली आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पवार यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.





