“कडवट हिंदुत्ववादीपासून मुसलमानांसमोर लाचार होईपर्यंत…” ; राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

Raj Thackeray on Uddhav Thackeray । राज्याच्या विधासभा निवडणुकीसाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत , त्यामुळे आता प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या प्रचारसभा मोठ्या प्रमाणात घेत आहेत. यंदाच्या निवडणुकीत अनेक पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे असल्याचे दिसत आहे. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाही समावेश आहे. माझ्याशिवाय महायुतीचे सरकार बसणार नाही असे मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरेंनी सांगितलं आहे आहे. दरम्यान, दिंडोशी याठिकाणी आयोजित एका प्रचारसभेत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर कडाडून टीका केली.
दिंडोशीतील सभेत बोलताना राज ठाकरे यांनी,”निवडणूक सभांचा प्रचार करणं कंटाळवाणं असतं. आता टीव्हीवर लाइव्हही दाखवतात. तेच तेच बोलावं लागतं. किती गोष्टी तुम्ही ऐकल्या मला माहीत नाही. पण तेच तेच विषय बोलावे लागतात असेही राज ठाकरे यांनी यावेळी म्हटले. एवढेच नाही तर त्यांनी शिवसेना या पक्षातल्या फुटीवर त्यांनी भाष्य केले.
पाच वर्षांतला गोंधळ तुम्ही पाहिला Raj Thackeray on Uddhav Thackeray ।
पुढे बोलताना राज ठाकरे यांनी,” मागच्या पाच वर्षांतला सगळा गोंधळ तुम्ही पाहिला आहे. काय गोष्टी घडल्या? कोण कुणाबरोबर गेलं? तुम्हाला माहीत आहे. कुठपर्यंत गेलं प्रकरण? हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ती आज एकनाथ शिंदेंकडे गेली. निवडणूक चिन्हासकट ती शिवसेना गेली. मला अजूनही आठवतंय मराठवाड्यात एक घोषणा होती. बाण हवा की खान? दुर्दैव असं की उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय. उरलेत फक्त खान. वर्सोव्यात उमेदवार कोण दिलाय? हारुन खान. हा शिवसेनेचा उमेदवार आहे. ज्याच्या नावात हारुन आहे तो विजयी कसा होईल?” असा प्रश्न विचारत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली.
कडवट हिंदुत्ववादीपासून मुसलमानांसमोर लाचार होईपर्यंत Raj Thackeray on Uddhav Thackeray ।
पुढे राज ठाकरे म्हणाले, “इथपर्यंत तुमची वेळ गेली? कडवट हिंदुत्ववादीपासून मुसलमानांसमोर लाचार होईपर्यंत. उबाठा शिवसेनेचे उमेदवार उर्दूत पत्रक काढत आहेत. कुठपर्यंत मजल गेली आहे बघा. मी मनसेच्या जाहिराती दिल्या मध्यंतरी वर्तमान पत्रांमध्ये. त्या तुम्ही कदाचित पाहिल्या असतील. मी टाइम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पानावरही मराठी जाहिरात दिली होती. इंग्रजी वर्तमानपत्र आहे म्हणून इंग्रजीत जाहिरात नाही दिली. सगळ्याच गोष्टी सोडून द्यायच्या असतील तर तुमच्याकडे (उद्धव ठाकरे) उरलं काय? आपल्याकडे इथे छान कंदिल आहे. चांगली गोष्ट आहे. आपण शिवाजी पार्क मैदानावर दीपोत्सव साजरा करतो. तो दीपोत्सव बघायला हजारोंच्या संख्येने लोक येतात. रविवारी अचानक सगळे लाइट बंद करुन टाकले. १४ तारखेला पंतप्रधान येणार आहेत. त्यामुळे दिवाळीचे लाइट्स काढून टाकले. दिवाळीच्या लाइटशी पंतप्रधानांच्या सुरक्षेशी काय संबंध? नको तिथे कशाला सिक्युरीटी?” असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा





