Raj Thackeray On Sharad Pawar: ‘महाराष्ट्राचा मणिपूर होऊ शकतो’; शरद पवारांच्या दाव्यावर राज ठाकरे म्हणतात, ‘आपण हातभार लावू नये…’

Raj Thackeray On Sharad Pawar | Manipur : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नवी मुंबईमधील वाशी येथे सामाजिक ऐक्य परिषद भरवली होती. या परिषदेला संबोधित करताना पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आगामी काळात महाराष्ट्रातही मणिपूर सारखं काहीतरी घडू शकत आणि मोदींनी मणिपूरकडे ढुंकूनही पाहिलं नाही, अशी टीका शरद पवार यांनी केली होती.
शरद पवार यांच्या या वक्तव्यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अतिशय मोजक्या शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे. आज (दि. २९) राज ठाकरे पुण्यात आले असताना त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता.
यावेळी ‘महाराष्ट्राचा मणिपूर होऊ शकतो असं विधान शरद पवारांनी केलं’ असल्याचं सांगत राज ठाकरेंना त्यावर प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर राज ठाकरे म्हणाले की, ‘शरद पवारांनी यासाठी हातभार लावू नये इतकी आशा आहे’ असा टोला लगावला.
महाराष्ट्रता जे चालू आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे. फक्त मतांसाठी मन कलुषित करणं जे सुरु आहे ते चांगलं लक्षण नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. फक्त मतांसाठी मन कलुषित करणं जे सुरु आहे ते चांगलं लक्षण नाही.
मी लहान मुलींचे व्हिडीओ पाहिले, ते अत्यंत दुर्दैवी आहेत. राजकारण्यांनी यावर विचार केला पाहिजे.’ असं देखील राज ठाकरे यावेळी म्हणाले.
काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार म्हणाले की, ‘मणिपूरमध्ये जे काही घडलं त्यानंतर ते राज्य अस्थिर झालं आहे. परंतु, आपल्या देशाच्या पंतप्रधानांना एकदाही तिकडे जावं अंसं वाटलं नाही. मोदींना मणिपूरमधील नागरिकांना दिलासा द्यावासा वाटला नाही.
मणिपूरमध्ये घडलं तेच आजूबाजूच्या राज्यांमध्ये, महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यांमध्ये घडलं, कर्नाटकातही घडलं, त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातही असं काहीतरी घडेल, अशी चिंता आता वाटू लागली आहे.
सुदैवाने महाराष्ट्राला दिशा देणारे अनेक युगपुरुष होऊन गेले आहेत. त्यांच्या विचारांमुळे आपलं राज्य वेगवेगळ्या आघाड्यांवर प्रगती करत राहिलं आहे, असं शरद पवार म्हणाले होते.





