Raj Thackeray on BMC Election। राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. प्रत्येक पक्ष स्थानिक पातळीवर आपली ताकद पडताळून पाहत आहे. दरम्यान, या सगळ्यात मुंबई महानगर पालिकेवर सर्वपक्षाचा डोळा आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, यासंदर्भात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महत्त्वाची बैठक काल मुंबईत पार पडली. या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या ताकदीबाबत पदाधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. मनसेने लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा देऊन विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवली होती. आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे यांचा पक्ष युती करणार की एकटाच लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्राप्त माहितीनुसार, काल झालेल्या या महत्त्वाच्या बैठकीत भाजपसोबतच्या युतीबाबत चर्चा झाली. या बैठकीला राज ठाकरेंशिवाय पक्षाचे नेते आणि अधिकारी उपस्थित होते. भाजपसोबत युती होणार का? Raj Thackeray on BMC Election। राज ठाकरे आणि भाजप या दोघांची पार्टी लाइन हिंदुत्व आहे, त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये युती होण्याची शक्यता आहे. भाजपसोबत युती झाली तर राज ठाकरेंकडून तशापध्दतीने तयारी सुरु करण्यात येत आहे. युतीबाबत चर्चा करण्यासाठी आणि इतर बाबींवर चर्चा करण्यासाठी एक गट नेमण्यात येणार आहे. मनसेच्या वरिष्ठ नेत्यांची टीम सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेणार असून त्यानंतर युतीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. मनसे पक्षाच्या स्थानिक परिस्थितीच्या आधारे चर्चा पुढे नेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. राज ठाकरे शिंदे गटावर नाराज का? Raj Thackeray on BMC Election। दरम्यान, विधानसभा आणि लोकसभेत शिंदेंसोबत युती करण्याच्या मनसेची तयारी असताना आणि भाजपकडून हिरवा कंदीलही मिळाला असताना, शिंदे यांनी मनसेचा युतीचा मार्ग रोखला. विधानसभेत मनसे आणि शिंदे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे राहिले, त्यामुळे दोघांनीही काही जागा गमावल्या, पण ठाकरेंना अनेक ठिकाणी याचा फायदा झाला, असे राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना सांगितले. मात्र महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा युती करण्याबाबत मनसे पक्ष सकारात्मक असल्याची महत्वाची माहिती समोर येत आहे.