Raj Thackeray VIDEO: ‘ते पक्ष सोडणं नव्हतं, घर सोडणं होतं’; उद्धव ठाकरेंसमोर राज ठाकरे भावूक

राज-उद्धव एकाच मंचावर; जुन्या वेदना विसरून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा.

Updated On:

Raj Thackeray: “मी ज्यावेळी शिवसेनेतून बाहेर पडलो, तो माझ्यासाठी केवळ राजकीय निर्णय नव्हता. ते माझे स्वतःचे घर सोडण्यासारखे होते,” अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या मनातील दोन दशकांपासूनची वेदना थेट उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात दोन्ही ठाकरे बंधू एकाच मंचावर आले होते. यावेळी ते बोलत होते.

मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडलेल्या या ऐतिहासिक सोहळ्यात राज ठाकरे यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. गेल्या २० वर्षांत काळ खूप पुढे गेल्याचे सांगत ते म्हणाले, “या दोन दशकांत मलाही अनेक गोष्टी उमजल्या आहेत आणि मला खात्री आहे की उद्धव यांनाही त्या समजल्या असतील. त्यामुळे आता जुन्या गोष्टी उकरून काढण्यात काहीच अर्थ नाही, जे झाले ते आता सोडून दिले पाहिजे.”

‘बाळासाहेब आज नाहीत, हेच बरं झालं’
सध्याच्या राजकीय स्थितीवर राज ठाकरे यांनी अत्यंत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. “आज देशात आणि महाराष्ट्रात ‘गुलामांचा बाजार’ भरला आहे. कल्याण-डोंबिवलीसह अनेक ठिकाणी जे गलिच्छ राजकारण सुरू आहे, ते पाहून मला शिसारी आली आहे.

हे सर्व पाहायला आज बाळासाहेब आपल्यात नाहीत, हेच सर्वात चांगले झाले. कारण हिंदुत्वाचा हा मांडलेला बाजार पाहून त्यांना प्रचंड वेदना झाल्या असत्या, तो माणूस हे सहनच करू शकला नसता,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

प्रमोद महाजन आणि बाळासाहेबांचा ‘तो’ किस्सा
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधताना राज ठाकरेंनी १९८४-८५ सालचा एक किस्सा सांगितला. “बाळासाहेबांनी एकदा प्रमोद महाजनांना सांगितले होते की, मी या देशातील हिंदूंना ‘हिंदू’ म्हणून मतदान करायला लावीन. त्यावेळी महाजनांना ही गोष्ट अशक्य वाटली होती. मात्र, बाळासाहेबांनी ती करून दाखवली. आज जे हिंदुत्वाच्या नावाने आरडाओरडा करत आहेत, त्यांना त्यावेळी याची कल्पनाही नव्हती,” असे राज यांनी सांगितले.

बाळासाहेब ठाकरे अष्टपैलू व्यक्तिमत्व
बाळासाहेब ठाकरे हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते, असे सांगताना राज ठाकरे म्हणाले की, “हत्तीच्या गोष्टीप्रमाणे बाळासाहेब प्रत्येकाला वेगवेगळे वाटले, पण ते जगाला पूर्णपणे कधीच समजले नाहीत. त्यांच्या व्यंगचित्राच्या रेषेवर बाहेरच्या जगाचा कधीच परिणाम झाला नाही. मला भविष्यात बाळासाहेबांच्या या विविध पैलूंवर एक सविस्तर व्याख्यान द्यायला नक्कीच आवडेल.”

या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते संजय राऊत आणि अमित ठाकरे यांचीही उपस्थिती होती. ठाकरे बंधूंनी एकत्र येत एकमेकांबद्दल सामंजस्याची भूमिका घेतल्याने भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

हेही वाचा – Solapur Ideal Marriage: माजी आमदाराच्या कन्येचा अवघ्या 150 रुपयांत विवाह; राज्यात होतेय चर्चा 

आणखी संबंधित बातम्या

Vidhan Parishad Election 2026 : शिंदेंची गुप्त दिल्लीवारी, फडणवीसांची ‘वर्षा’वर बैठक; महायुतीत नेमकं काय सुरूऐ?

2026-05-26 09:36:12

Vidhan Parishad Election 2026 : शिंदेंची गुप्त दिल्लीवारी, फडणवीसांची ‘वर्षा’वर बैठक; महायुतीत नेमकं काय सुरूऐ?

Eknath Shinde : एकनाथ शिंदे बालेकिल्ल्यातच मोठा डाव टाकणार? बड्या नेत्याचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा

2026-05-26 08:25:19

Eknath Shinde : एकनाथ शिंदे बालेकिल्ल्यातच मोठा डाव टाकणार? बड्या नेत्याचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा

Sanjay Gaikwad : "संजय गायकवाड फक्त कव्हर पेज वाचतात, आतमध्ये काय माहीतच नसतं," ठाकरे गटाच्या नेत्याचा टोला

2026-05-25 10:13:32

Sanjay Gaikwad : "संजय गायकवाड फक्त कव्हर पेज वाचतात, आतमध्ये काय माहीतच नसतं," ठाकरे गटाच्या नेत्याचा टोला

Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांना न्यायालयाचा दणका; प्रशांत आंबी यांना धमकावल्याप्रकरणी अडचणी वाढल्या, आता थेट...

2026-05-24 09:10:14

Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांना न्यायालयाचा दणका; प्रशांत आंबी यांना धमकावल्याप्रकरणी अडचणी वाढल्या, आता थेट...

Pimpari News : श्रीकांत नवले यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या "शहरप्रमुखपदी" निवड

2026-05-24 00:15:22

Pimpari News : श्रीकांत नवले यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या "शहरप्रमुखपदी" निवड