Raj Thackeray : ठाकरे बंधुंच्या युतीनंतर आज मनसेचा पहिला गुढीपाडवा मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
Raj Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरे हे या मेळाव्यातून कार्यकर्त्यांना संबोधित करणार असून संध्याकाळी 6 वाजता मेळाव्याला सुरुवात होईल.

Raj Thackeray : दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा आज मुंबईतील शिवाजी पार्कवर होणार आहे. राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होणार असून यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे हे या मेळाव्यातून कार्यकर्त्यांना संबोधित करणार असून, त्यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मेळाव्यासाठी दोन स्क्रीन ही मैदानात लावल्या असल्याने त्यावर कोणाचा व्हिडिओ लावला जाणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. संध्याकाळी ५:०० वाजता मेळाव्याला सुरुवात होणार आहे.
विशेष म्हणजे ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीनंतर हा पहिलाच गुढीपाडवा मेळावा असल्याने, या युतीवर राज ठाकरे काय भाष्य करणारहे पाहणेही महत्त्वाचे ठरेल. Raj Thackeray
मनसेकडून टीझर आऊट Raj Thackeray
दरम्यान, 16 मार्चला गुढीपाडव्या मेळाव्याचा मनसेकडून टीझर आऊट झाला होता. यामध्ये राज ठाकरे यांच्या धडाकेबाज आवाजामध्ये मराठी माणसांसाठी आवाहन करण्यात आले आहे. तसेच राज ठाकरेंच्या आधीच्या भाषणातील मराठी माणसांच्या हक्कासाठी उठवलेला आवाज टीझरमध्ये देखील ऐकू येत आहे.
टीझरमध्ये महाराष्ट्रात जे चाललयं ते पटत नाहीये? रोजच्या घटना पाहून मनस्ताप होतोय? महाराष्ट्राची ही अवस्था बघून अस्वस्थ झाला आहात? असे सवाल विचारले आहेत. तसेच पुढे तुम्ही एकटे नाही आहात महाराष्ट्रावर प्रेम असणाऱ्या प्रत्येकाला असचं वाटतयं चला शिवतीर्थवर भेटूया उज्वल महाराष्ट्र घडवूया, अशी साद घालण्यात आली आहे.
त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मी मराठी माणसावर प्रेम करतो, महाराष्ट्रातील मराठी माणसांवर प्रेम करतो. मराठी भाषेवर प्रेम करतो आणि टोकाचं प्रेम करतो. एक गोष्ट निश्चित सांगतो की, महाराष्ट्राच्याबाबतीत, मराठी माणसांच्या बाबतीत आणि मराठी भाषेच्याबाबतीत राज ठाकरे कोणाशीही तडजोड करणार नाही, असे राज ठाकरेंचे सभेमधील वक्तव्य देखील या टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे.
गुढीपाडवा मेळावा २०२६
स्थळ- शिवतीर्थ
वेळ- सायंकाळी ५ वाजता #MNSAdhikrut pic.twitter.com/dhWZNgjFCf— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 16, 2026
राज ठाकरे कोणत्या मुद्द्यांवर भाष्य करण्याची शक्यता? Raj Thackeray
राज ठाकरे हे शिवतीर्थावरुन आपल्या नेहमीच्या खास आक्रमक शैलीत मराठी भाषा, मराठी माणसांची गळचेपी आणि सध्याचे राजकारण यावर बोलतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. Raj Thackeray
याशिवाय दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात झालेला मृत्यू आणि त्यानंतर घातपात असल्याचा संशय, इराण-इस्राइल देशात सुरू असलेले युद्ध त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेला गॅस आणि कच्चा तेलाचा तुटवडा या मुद्यांवर सरकारवर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:






