Raj Thackeray : मेळाव्याआधी मनसेतील अंतर्गत धुसफूस बाहेर; ‘या’ नेत्याच्या पोस्टरला फासलं काळं

पालघर : आज शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा (Raj Thackeray) पार पडणार आहे. या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मात्र या मेळाव्याचा अगोदर पक्षातील (Raj Thackeray) अंतर्गत धुसफूस बाहेर आली आहे. राज ठाकरे यांच्या खास शिलेदाराच्या बॅनरवरील फोटोला काळं फासण्यात आले. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
ही घटना पालघरमध्ये घडली आहे. या ठिकाणी मनसैनिकांना गुढीपाडवा मेळाव्यासाठी आवाहन करणाऱ्या बॅनरवरील मनसे नेते अविनाश जाधव यांच्या फोटोला काळं फासण्यात आले आहे. पालघरच्या बोईसर मधील ओसवाल परिसरात लागलेल्या बॅनरवरील फोटोला काळं फासण्यात आले आहे. यामुळे मनसे नेते अविनाश जाधव आणि पालघर मधील मनसैनिकांमध्ये असलेला वाद पुन्हा एकदा समोर आला आहे.
हे पण वाचा : ‘तोपर्यंत रामलल्लाचे दर्शन घेऊ देणार नाही…’ ; ब्रिजभूषण शरण सिंह यांचा राज ठाकरेंना थेट इशारा
अविनाश जाधव यांच्या कार्यपद्धतीबाबत यापूर्वी स्थानिक मनसैनिकांनी आक्षेप घेतले होते. मात्र, स्थानिक मनसैनिकांमध्ये जाधवांबद्दल असलेला रोष अद्याप कमी झाला नसल्याचे या गोष्टीच्या माध्यमातून पुन्हा एकदा समोर आले आहे.
अवघे अवघे या… #गुढीपाडवामेळावा२०२५#शिवतीर्थ #मुंबई pic.twitter.com/T2a0bOahZ5
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 28, 2025
आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लक्षात घेता राज ठाकरे यांनी पक्षात संघटनात्मक पातळीवर बदल करण्यास सुरुवात केली आहे. मागच्या विधानसभेत मनसेला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे मनसेने आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या मनसेच्या पाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) काय घोषणा करतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
ब्रिजभूषण शरण सिंह यांचा राज ठाकरेंना थेट इशारा
उत्तर प्रदेशातील कैसरगंजचे भाजपचे माजी खासदार ब्रजभूषण सिंह यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. “जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांना रामलल्लाचे दर्शन घेऊ देणार नाही,” असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे. ब्रिज भूषण यांनी एका सार्वजनिक व्यासपीठावरून हा इशारा दिला आहे.





