Shiv Sena : उद्धव ठाकरेंमुळेच राज ठाकरेंनी शिवसेना सोडली; शिवसेनेच्या बड्या नेत्याचा दावा

Raj Thackeray | उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू झाल्या. दोन्ही ठाकरे बंधुंकडून यावर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया समोर आल्या. ज्यावरून काहींनी टीका केली तर काही दोघांच्याही एकत्र येण्याच्या चर्चांचे स्वागत केले. अशातच आता शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. Naresh Mhaske
उद्धव सेनेत गर्दी जमवणारा नेता राहिला नसल्याने महापालिका निवडणुकीसाठी त्यांना राज ठाकरेंची गरज भासतेय, तसेच उद्धव ठाकरेंमुळेच मनसेप्रमुख राज ठाकरे यांना शिवसेना सोडावी लागली, असा टोला शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी लगावला. सोमवारी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. Raj Thackeray |
शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उत्तरोत्तर होणारी प्रगती आणि जनमाणसांतील प्रतिमा उजळल्याने उद्धव सेना आणि संजय राऊत यांच्या अंगाची लाही लाही झाली आहे. त्यांना आता कैलास जीवन लावावे लागेल, अशी नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे, अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली. Shiv Sena |
राज ठाकरे यांच्या घराला कॅफेटेरिया म्हणणे, हे उद्धव ठाकरे यांच्या परवानगीशिवाय राऊत बोलू शकतात का? असा प्रश्न नरेश म्हस्के यांनी यावेळी केला. उद्धव सेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. मात्र, कामाचे निमित्त सांगून आदित्य ठाकरे फडणवीस यांना भेटतात, ही त्यांची दुटप्पी भूमिका आहे. संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या पक्षाला भेसळ म्हटले आहे. खरेच भेसळ आहात की असली ते खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट करावे, असं आवाहन नरेश म्हस्के यांनी यावेळी केले. Raj Thackeray on Uddhav Thackeray |
उद्धव ठाकरे हे आधुनिक काळातील दुर्योधन
पुढे बोलताना नरेश म्हस्के म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना शिवसेनेतून खड्यासारखे बाजूला केलं होतं. त्यामुळं उद्धव ठाकरे हे आधुनिक काळातील दुर्योधन आहेत. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावेळी उबाठाने विरोध केला. बाळासाहेबांना हिंदुह्रदयसम्राट म्हणायला तुम्हाला लाज वाटते. हे तुमचे हिंदुत्व आहे का?”, असा सवाल खासदार नरेश म्हस्के यांनी उपस्थित करत शिवसेना (उबाठा) गटावर घणाघाती टीका केली आहे. Uddhav Thackeray |





