राज ठाकरे लीलावती रूग्णालयात दाखल; आज होणार शस्त्रक्रिया
Updated On:

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मंगळवारी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यांच्या गुडघ्याच्या आणि पाठीच्या समस्येवर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे असे त्यांनी स्वताच या आधी स्पष्ट केले होते.
53 वर्षीय ठाकरे यांच्यावर उद्या मंगळवारी हिपवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. राज ठाकरे 5 जुन रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार होते.
पण त्यांच्या या शस्त्रक्रियेमुळे आणि अन्य कारणामुळे त्यांचा हा अयोध्या दौरा रद्द करण्यात आला होता. शस्त्रक्रियेनंतर लगेचच आपण सक्रिय होऊन राज्यात प्रचार दौरे सुरू करणार आहोत असे राज ठाकरे यांनी पुण्यातील त्यांच्या सभेत नमूद केले होते.





