Raj Kundra: किडनी दानाच्या चर्चेनंतर झालेल्या ट्रोलला राज कुंद्राने दिल स्पष्ट उत्तर …

Raj Kundra: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा सध्या चर्चेत आले आहेत. १४ ऑगस्ट रोजी शिल्पा आणि राज कुंद्रा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात गेले होते. त्या वेळी राज कुंद्रांनी महाराजांना एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट सांगितली. “माझी इच्छा आहे की मी तुम्हाला माझी एक किडनी दान करावी. तुमच्या वेदना मला समजतात आणि जर मी तुमच्या कामी आलो, तर माझी किडनी तुमच्या नावाची.” हे ऐकून शिल्पा शेट्टीसुद्धा थोड्या वेळासाठी थक्क झाली.
या विधानानंतर सोशल मीडियावर राज कुंद्राचा विषय प्रचंड चर्चेत आला. अनेकांनी त्यांच्या या वक्तव्याला पीआर स्टंट म्हटले आणि त्यांची खिल्ली उडवली.
यावरच आता राज कुंद्राने आपल्या एक्स (माजी ट्विटर) अकाउंटवरून जोरदार प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले,“आपण खूप विचित्र जगात राहतो. जेव्हा कोणी एखाद्याचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचा एक भाग द्यायचा निर्णय घेतो, तेव्हा त्याला पीआर स्टंट म्हणत हसले जाते. जर करुणा म्हणजे स्टंट असेल, तर जगाने हे अजून बघायला हवे. जर मानवता ही फक्त एक रणनीती असेल, तर अधिकाधिक लोकांनी ती स्वीकारायला हवी.”
Strange world we live in when someone chooses to offer a part of themselves to save another’s life, it’s mocked as a PR stunt. If compassion is a stunt, may the world see more of it. If humanity is a strategy, may more people adopt it. I’m not defined by labels the media or…
— Raj Kundra (@onlyrajkundra) August 15, 2025
त्यांनी पुढे लिहिलं,
“मला माध्यमं किंवा ट्रोल्स यांनी दिलेल्या लेबल्सनी परिभाषित केलं जाऊ शकत नाही. माझं भूतकाळ माझ्या वर्तमानातील निवडी मिटवू शकत नाही. माझ मोजमाप करण्याचा अधिकार कुणालाही नाही. लोकांना कमी जज करा, कमी टीका करा आणि लोकांवर अधिक प्रेम करा… कदाचित तुम्हीसुद्धा एखाद्याचे प्राण वाचवू शकाल. राधे-राधे.”
राज कुंद्रांच्या या स्पष्ट आणि ठाम उत्तरानंतर त्यांच्या समर्थकांनी त्यांना सोशल मीडियावर साथ दिली आहे.





