शिल्पा शेट्टीचे नाव घेताच भडकला राज कुंद्रा; सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

Raj Kundra | बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. राज कुंद्राशी संबंधित मुंबई, उत्तर प्रदेशातील विविध ठिकाणच्या 15 मालमत्तांवर शुक्रवारी सक्तवसुली संचालनालयाने (ED) छापे टाकले. पोर्नोग्राफी प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. त्यांच्या घरावर, कार्यालयासह अन्य ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. पोर्नोग्राफीची ही बाब अनेक वर्षे जुनी असून, आता पुन्हा एकदा अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा अडचणीत सापडले आहेत.
गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या प्रकरणात ईडीने राज कुंद्राची चौकशी केली होती. अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी राजला मुंबई पोलिसांनी जुलै 2021 मध्ये अटकसुद्धा केली होती. आता ईडीच्या छापेमारीनंतर राज कुंद्राची प्रतिक्रिया समोर आली आहे. शिल्पा शेट्टीचे नाव या प्रकरणात घेतले हात असल्याने राज कुंद्राने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
राज कुंद्राची पोस्ट-
‘मीडियाला नाटकाची आवड तर आहेच, पण काही तथ्य समोर आणणं गरजेचं आहे. गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या तपासाला मी पूर्णपणे सहकार्य करत आहे. सहकारी, पॉर्नोग्राफी आणि मनी लाँड्रींगचा दावा करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की, याबद्दल कितीही सनसनाटी केली जात असली तरी सत्य लपणार नाही. अखेर न्यायाचा विजय होईल. पण माझ्या पत्नीचं नाव तिच्याशी संबंधित नसलेल्या प्रकरणांमध्ये वारंवार ओढणं मला मान्य नाही. कृपया मर्यादांचा आदर करा’, असे त्याने या पोस्टद्वारे खडसावले आहे. Raj Kundra |
दरम्यान, राज कुंद्रावर अश्लील चित्रपट बनवल्याचा आरोप आहे. ‘हॉटशॉट्स’ हे ॲप कुंद्राने 2019 मध्ये स्थापन केलेल्या आर्मस्प्राईम मीडिया प्रायव्हेट लिमिटेडद्वारे विकसित केला गेल्याचा आरोप होता. या प्रकरणाशी संबंधित कुंद्रा आणि अन्य तीन आरोपींविरुद्ध मुंबई पोलिसांनी चार्जशीटही दाखल केला होता. Raj Kundra |
राज कुंद्रा याला गुन्हे शाखेने जुलै 2021 मध्ये अटक केली होती. या प्रकरणी शहर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. राज कुंद्रा यांनी आपल्यावरील सर्व आरोप चुकीचे असल्याचे जाहीर केले आहे. या प्रकरणी त्याला दोन महिने तुरुंगवासही भोगावा लागला होता. एप्रिलमध्ये यंत्रणेनं बिटकॉइन गुंतवणूक फसवणूक प्रकरणातही कुंद्राच्या मालकीची करोडो रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता तात्पुरती जप्त केली होती. सध्या राज कुंद्रा तुरुंगाच्या बाहेर असला तरी, आता मात्र पुन्हा एकदा तो तुरंगात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा:
चिन्मय दासच्या अटकेनंतर बांगलादेशची आणखी एक कारवाई ; 16 इस्कॉन सदस्यांची बँक खाती गोठवली





