पुणे शहर परिसरात पावसाची विश्रांती
Updated On:

पुणे – मान्सून दाखल झाल्यानंतर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात असणारा पावसाचा जोर आता काहीसा ओसरला आहे. पुण्यातही पावसाने दिवसभर विश्रांती घेतली.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार कोकण वगळता तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. गेले तीन ते चार दिवसांपासून असणाऱ्या पावसाच्या जोरामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात नद्यांना पूर आले होते.





