Rain update : देशात पावसाचा धुमाकूळ! चार महिन्यांत तब्बल १६०० जणांचा मृत्यू
Updated On:
Rain update – देशातील काही राज्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला असून एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या कालावधीत पाऊस आणि वीज कोसळून १,६०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, अशी माहिती बुधवारी गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी संसदेत दिली. राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही आकडेवारी जाहीर करण्यात आली.
विविध राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, २०२५-२६ मध्ये ३१ जुलैपर्यंत पाऊस आणि वीज कोसळून १,६२६ लोकांचा मृत्यू झाला. तसेच ५२,३६७ प्राण्यांचेही प्राण गेले असून १,५७,८१७.६ हेक्टर पीक क्षेत्र प्रभावित झाले आहे, अशी माहिती राय यांनी दिली.





