मध्य महाराष्ट्रासह कोकण-गोव्यात पावसाचा अंदाज
Updated On:

पुणे – राज्यात ऑक्टोबर हिट, मध्येच थंडी अशा वातावरणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पूर्वेकडून येणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्यांमुळे येत्या दोन दिवसांत कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
दरम्यान, सध्या “पुणे’ हे महाबळेश्वरपेक्षा गारेगार झाले आहे. महाबळेश्वरमध्ये 15.5 तर पुण्यात 14 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर जळगाव जिल्ह्यात सर्वांत कमी 11.5 अंश सेल्सिअस किमान तापमान आहे. कात्रज, एनडीए चौक, बावधन, पाषाण यासह उपनगरातील डोंगर टेकडीचा भागात थंडी चांगलीच जाणवत आहे. तसेच सकाळीही धुके आणि थंडीमुळे मॉर्निंगवॉकला बाहेर पडणाऱ्यांच्या वेळेत बदल झाले आहेत. दरम्यान, ऑक्टोबर हिट आणि आता थंडी मध्येच ढगाळ वातावरणामुळे आरोग्याच्या समस्याही उद्भवत आहेत.





