Hingoli News : हिंगोली जिल्ह्यात पावसाचा कहर! हिवरखेडा गावात पावसाने घर कोसळले
Updated On:

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा दिवसापासून ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळत आहे. पावसामुळे शेती पिकाचे अतोनात नुकसान देखील झाले आहे तसेच अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होती सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील साहेबराव कळणु जाधव यांचे राहते घर कोसळले. यात सुदैवाने कोणतेही जीवित हानी झाली नाही. या घरांमध्ये त्यांचे सर्व संसार उपयोगी साहित्य खाली दबून गेले आहे
गेल्या आठ दिवसापासून सतत धार पाऊस कोसळत आहे त्यामुळे साहेबराव जाधव यांच्या घराच्या पूर्ण भिंतीमध्ये पावसाचे पाणी मुरले होते आज दिनांक 16 /09/2025 रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घराच्या भिंती कोसळल्या यामध्ये कोणतेही जीवितहानी झाली नाही मात्र घरातील सर्व संसार उपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे प्रशासनाच्या वतीने तात्काळ पंचनामा करून आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी




