ओडिशातील रेल्वेसेवा हळूहळू पूर्वपदावर
Updated On:

भुबनेश्वर – फनी चक्रीवादळाच्या दणक्यामुळे ओडिशामध्ये रेल्वेमार्गांचेही नुकसान झाले आहे. दुरुस्तीनंतर आता हळूहळू येथील रेल्वेसेवा पूर्ववत होऊ लागली आहे. सध्या विविध मार्गांवर 12 डब्यांची रेल्वे सुरू करण्यात आली असून एक्स्प्रेसचा वेगही संथ ठेवण्यात आला आहे. लवकरच रेल्वेमार्ग पूर्णपणे सुरळीत झाल्यानंतर वेग आणि डब्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे.
दरम्यान, फनी वादळामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून अनेक ट्रेन्स रद्द करण्यात आल्या होत्या. फनी चक्रिवादळामुळे सावधगिरी म्हणून किनारपट्टी वर असलेल्या विविध जिल्ह्यांमधील तब्बल ११ लाख नागरिकांचं स्थलांतर देखील करण्यात आलं होतं.





