पाकिस्तानात बनावट चीनी कॉल सेंटरवर अधिकाऱ्यांनी टाकला छापा, संधी मिळताच नागरिकांनी केली लुटालूट; व्हीडिओ व्हायरल

इस्लामाबाद- पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये एक बनावट कॉल सेंटर चालवले जात होते. पाकिस्तानी अधिकाऱ्यांना याची माहिती मिळाली. यानंतर पाकिस्तानच्या तपास यंत्रणेने या बनावट कॉल सेंटरवर छापा टाकला. हे कॉल सेंटर इस्लामाबादमधील सेक्टर एफ-११ येथून चालवले जात होते. चिनी नागरिक त्याचे सूत्रधार आहेत. मात्र या छाप्यानंतर कॉल सेंटरबाहेरील दृश्य चर्चेचे केंद्र बनले आहे.
छाप्यादरम्यान पाकिस्तानच्या लोकांनी बनावट कॉल सेंटरची अक्षरश: लुटालूटच केली. लोक जी वस्तू हाताला येईल ती घेऊन पळ काढत होते. या घटनेचे व्हिडिओही व्हायरल झाले असून तो एक चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, इस्लामाबादमधील या बनावट कॉल सेंटरमधून जगभरात फसवणूक केली जात होती. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी यासंदर्भात २४ जणांना अटक केली आहे.
Pakistani firse apne aukaat pe aagaye!😂
Pakistanis have Looted Call Centre operated by Chinese in Islamabad; Hundreds of Laptop, electronic components along with furniture and cutlery stolen!😂😂 pic.twitter.com/mhFlByjzU6
— The Jaipur Dialogues (@JaipurDialogues) March 17, 2025
जेव्हा अधिकारी कॉल सेंटरवर छापा टाकण्यासाठी आले तेव्हा त्यांच्या मागून मोठ्या संख्येने जमाव बनावट कॉल सेंटरमध्ये घुसला. त्यांनी मिळेल ते उचलून पळ काढण्यास सुरूवात केली. केंद्रातून मोठ्या संख्येने लोक बाहेर पडताना दिसत होते. काहींच्या हातात लॅपटॉप तर काहींच्या हातात मॉनिटर होते. लोकांनी कॉल सेंटरमधून एक्सटेंशन, कीबोर्ड, डेस्कटॉप, लॅपटॉप, कटलरी सेट आणि अगदी फर्निचरही चोरले आहेत.
गेल्या वर्षी कराचीमध्ये एक नवीन मॉल उघडण्यात आला होता. त्यालाही पहिल्याच दिवशी दरोड्याचा सामना करावा लागला. शेकडो लोकांनी मॉलवर हल्ला केला. काही वेळातच लोकांनी संपूर्ण मॉल उद्ध्वस्त केला होता.





