कसोटी क्रमवारीत राहुलची प्रगती
Updated On:

दुबई – आयसीसीने कसोटी क्रिकेटमधील फलंदाजांची क्रमवारी जाहीर केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या लोकेश राहुलने प्रगती केली आहे. या क्रमवारीत राहुलने 18 स्थानांनी झेप घेतली असून तो 31 व्या स्थान मिळवले आहे.
राहुलशिवाय गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह आणि महंमद शामीच्या क्रमवारीतही सुधारणा झाली आहे. बुमराहच्या क्रमवारीत तीन स्थानांची सुधारणा झाली असून तो 9 व्या स्थानावर पोहोचला आहे.
शामीच्या क्रमवारीत दोन स्थानांची सुधारणा झाली आहे. तो 17 व्या स्थानावर पोहोचला आहे. मयंक अग्रवाल आणि अजिंक्य रहाणेच्या क्रमवारीत सुद्धा सुधारणा झाली आहे.





