“राहुल मेरे भाई, मुझे माफ करना…”; गायकाचा भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये अनोख्या अंदाजात पक्षप्रवेश

Rocky Mittal Left BJP Joins Congress | हरियाणा विधानसभेच्या निवडणूका लवकरच पार पडणार आहेत. त्यादृष्टीने राजकीय वर्तुळात हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रसिद्ध हरियाणवी गायक रॉकी मित्तल उर्फ जय भगवान मित्तल यांनी भारतीय जनता पार्टीला रामराम केला आहे. पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांच्या उपस्थितीत रॉकी मित्तल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खास अंदाजात रॉकी मित्तल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
युथ काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रॉकी मित्तल यांच्या पक्षप्रवेशाचा व त्यांनी गायलेल्या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. श्रीनिवास बी. व्ही. यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत रॉकी मित्तल काँग्रेसच्या मंचावर नाचत गाणं गाताना दिसत आहेत. “यारों में अंधा था अंधभक्ति में… ठोकर मैंने खाई. राहुल मेरे भाई, मुझे माफ करना… राहुल मेरे भाई…, हैं नफरत फैलाई हमने, तू ने मिटाई, राहुल मेरे भाई, मुझे माफ करना, राहुल मेरे भाई….” असे त्यांच्या गाण्याचे बोल आहेत. रॉकी मित्तल यांनी खास राहुल गांधींची माफी मागून पक्षात प्रवेश केला. Rocky Mittal Left BJP Joins Congress |
“मुझे माफ़ करना राहुल मेरे भाई…”
BJP नेता Rocky Mittal ने माफी मांगते हुए कुछ इस अंदाज में Congress Join की.. pic.twitter.com/KAiVICHgeJ
— Srinivas BV (@srinivasiyc) August 28, 2024
रॉकी मित्तल यांनी मागितली राहुल गांधींची माफी
रॉकी म्हणाले की, “मी काँग्रेस आणि त्यांचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात गाणी बनवली, पण त्यांनी माझ्याविरोधात कधीही तक्रारही केली नाही. आता मला वाटत आहे की मी चूकत होतो. मी काँग्रेस आणि राहुल गांधींविरोधात गाणी बनवली आहेत. गेल्या 14 वर्षांपासून मी राहुल गांधी यांच्याविरोधात अपशब्द वापरत आहे. ”
खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप
दरम्यान, रॉकी मित्तल यांनी 1 ऑगस्ट रोजी भाजप सोडला होता आणि आरोप केला होता की त्यांचे निस्वार्थ कार्य असूनही पक्षाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि गेल्या चार वर्षांत त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. गेल्या 14 वर्षांत त्यांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी 200 हून अधिक गाणी गायली, तरीही त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. Rocky Mittal Left BJP Joins Congress |
2021 मध्ये तुरुंगात टाकले
रॉकी मित्तल यांना 13 मार्च 2021 रोजी 2015 च्या एका प्रकरणात पोलिसांनी अटक करण्यात आली होती. कैथलमधील निदर्शनादरम्यान न्यायाधीशांशी गैरवर्तन आणि मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणी त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली, मात्र त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. Rocky Mittal Left BJP Joins Congress |
हरियाणामध्ये १ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणूक
हरियाणात १ ऑक्टोबर रोजी ९० जागांवर विधानसभा निवडणूकीसाठीमतदान प्रक्रिया राबवली जाईल. ४ ऑक्टोबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. या दिवशीच जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीचा निकाल देखील जाहीर केला जाणार आहे. Rocky Mittal Left BJP Joins Congress |
हेही वाचा:
ENG vs SL 2nd Test : आजपासून लॉर्ड्स कसोटीला सुरुवात, दोन्ही संघात महत्वपूर्ण बदल…





