दौंड विधानसभा मतदार संघातून राहुल कुल मोठ्या मताधिक्याने विजयी

Daund Assembly Election Result | महाराष्ट्रातील दौंड विधानसभा जागेसाठी झालेल्या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. महायुती दौंड विधानसभेसाठी राहुल कुल आणि महाविकास आघाडीतील रमेशप्पा किसनराव थोरात यांच्यात लढत झाली. यात आता शनिवारी सकाळी 8 वाजेल्यापासून सुरू झालेल्या मतमोजणीनुसार राहुल कुल यांनी आघाडी घेतली आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालात दौंडची जागा भाजपाचे राहुल कुल यांनी जिंकली होती. तर आता दौंड विधानसभा मतदार संघातून सहावी फेरीनुसार राहुल कुल ९५०० मतांनी आघाडीवर आहेत. रमेश थोरात हे पिछाडीवर असल्याचे दिसत आहे.
दौंड विधानसभा निवडणुकीच्या तेरावी फेरीत रमेश थोरात यांना 1098 मतांची आघाडी मिळाली आहे. तर भाजपचे नेते राहुल कुल 12567 मतांनी आघाडीवर होते. अखेर दौंड मतदारसंघातून राहुल कुल 14 हजार मतांनी विजयी झाले आहेत.
2019च्या विधानसभा निवडणुकीत रमेश थोरात यांचा पराभव
दरम्यान, 2019च्या विधानसभा निवडणुकीत आमदार राहुल कुल यांचा विजय हा काठावर झाला होता. रमेश थोरात यांचा अवघ्या 746 मतांनी निसटता पराभव झाला होता. यावेळी देखील रमेश थोरात पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. विधानसभेच्या 2009 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये रमेश थोरात अपक्ष निवडून आले होते, त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.




