राहुल गांधींची आज पुण्यात सभा; महाविकास आघाडीकडून शहरात शक्तिप्रदर्शन

Rahul Gandhi In Pune| – लोकसभा निवडणुकांच्या प्रचारसभांनी धुरळा उडत असून, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर पुण्यात आज शुक्रवारी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे. सायंकाळी ४ वाजता आरटीओजवळील एसएसपीएमएस मैदानावर ही सभा होणार असून, यानिमित्ताने महाविकास आघाडीकडून शहरात शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ ही सभा होणार आहे. काँग्रेस शहराध्यक्ष शिंदे आणि प्रदेश उपाध्यक्ष व प्रचारप्रमुख माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर या वेळी उपस्थित होते.
सभेसाठी अशी असणार व्यवस्था Rahul Gandhi In Pune|
या सभेसाठी ३० ते ३५ हजार नागरिकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव १० ते १२ हजार आसन क्षमता कमी झाली असल्याचे त्यांनी सांगितले. येथील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याजवळून व्हीव्हीआयपींना प्रवेश दिला जाणार आहे. या प्रवेशद्वारासह एकूण तीन प्रवेशद्वार ठेवण्यात आले असून, ४ ठिकाणी एलईडी स्क्रीन उभारण्यात आल्या आहेत. सभेच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, बिस्कीट, रुग्णवाहिका आणि डॉक्टरांची पथके तैनात ठेवण्यात आल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
दिग्गज नेत्यांची उपस्थिती Rahul Gandhi In Pune|
सभेसाठी महासचिव रवि चेन्नी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा:
Weather Update| कोकणासह ‘या’ भागात उष्णतेची लाट राहणार कायम; तर काही ठिकाणी पावसाची शक्यता





